बिग बॉस हाउस : मनू या एपिसोडमधून करणार कमबॅक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 18:03 IST2016-12-09T17:55:20+5:302016-12-09T18:03:16+5:30
आईच्या निधनामुळे घराबाहेर पडलेला मनू पंजाबी लवकरच बिग बॉसच्या घरात कमबॅक करणार आहे. मनू घराबाहेर पडल्यामुळे मनवीर आणि मोना ...

बिग बॉस हाउस : मनू या एपिसोडमधून करणार कमबॅक!
आ च्या निधनामुळे घराबाहेर पडलेला मनू पंजाबी लवकरच बिग बॉसच्या घरात कमबॅक करणार आहे. मनू घराबाहेर पडल्यामुळे मनवीर आणि मोना गेममधून जणू काही बाहेरच पडले असून, त्यांना मनूची उणीव सातत्याने जाणवत आहे. तसेच त्याच्या फॅन्सनाही मनू केव्हा घरात परतणार हा प्रश्न सतावत आहे. मात्र मनू लवकरच परतणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने मनवीर, मोनासह त्याच्या फॅन्सनाही दिलासा मिळेल यात शंका नाही.
![]()
आईच्या निधनामुळे मनूला घराबाहेर जावे लागले होते. मात्र तो बाहेर का पडला हे घरातील इतर सदस्यांना माहीत नसल्याने सगळ्यांनाच त्याची एक्झिट धक्कादायक होती. मनवीर आणि मोना तर यामधून अद्यापपर्यंत सावरलेले नाहीत. त्यांचे घरातच नव्हे तर गेममध्येही फारसे लक्ष लागत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सध्या लग्जरी बजेटसाठी घरात बीबी टॅक्सी स्टॅँड टास्क सुरू असून, सर्व कंटेस्टेंट्स हा टास्क जिंकण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र यात मोना आणि मनवीर कुठेही दिसत नाहीत.
त्यातच स्वामी ओम यांनी किचनमध्ये टॉयलेट केल्याने मनवीरने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्याला रागावर नियंत्रण ठेवणे जवळपास अशक्य झाले होते. कदाचित मनू याठिकाणी असता तर चित्र वेगळे असते. मात्र आता मनू घरात परतणार असल्याने घरातील ‘एम फॅक्टर’ आणखी स्ट्रॉँग होण्याची शक्यता आहे.
![]()
दरम्यान ८ किंवा ९ डिसेंबर रोजी मनूची घरवापसी निश्चित मानली जात आहे. मात्र त्याचा घरातील प्रवेश पूर्णपणे निर्मात्यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याने तो पुढील आठवड्यात घरात प्रवेश करू शकतो, अशीही माहिती समोर येत आहे. जर त्याला घरात प्रवेश करण्याची परवानगी दिली गेली तर तो येत्या शुक्रवारी किंवा ‘विकेण्ड के वॉर’ या एपिसोडमध्ये दिसू शकतो.
मनूच्याबाबतीत घडलेला हा प्रसंग यापूर्वीदेखील घडलेला आहे. बिग बॉसचा एक्स कंटेस्टेंट कीथ सिकेरा याच्या भावाचेदेखील शोदरम्यान निधन झाले होते. त्यालासुद्धा मध्येच हा शो सोडून जावे लागले होते. मनूच्या आईच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर किथने ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले. तसेच मनूची गर्लफ्रेंड प्रियानेदेखील मनू घरात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
![]()
सामान्य स्पर्धकांमधून मनू पंजाबी हा अत्यंत प्रसिद्ध आहे. मोनालीसाबरोबरचे त्याचे लिंकअप खूूपच चर्चेत आहे. वन लायनर्स, रागीट आणि फ्लर्टी नेचर असलेला मनू घरातील इतर स्ट्रॉँग कंटेस्टेंटपैकी एक आहे.