बिग बॉस : ...अखेर स्वामी ओमविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 17:09 IST2017-01-11T17:09:36+5:302017-01-11T17:09:36+5:30

बिग बॉस सीझन-१० चे सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ...

Bigg Boss: ... finally filed a complaint against Swami Om | बिग बॉस : ...अखेर स्वामी ओमविरुद्ध गुन्हा दाखल

बिग बॉस : ...अखेर स्वामी ओमविरुद्ध गुन्हा दाखल

ग बॉस सीझन-१० चे सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान तसेच बिग बॉसच्या निर्मात्यांवर आरोपांच्या फैरी झाडणाºया स्वामी ओमवर गुन्हा दाखल झाल्याने आता तरी ते आपल्या वाणीवर लगाम लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

बिग बॉसच्या घरात गलिच्छ वर्तणूक केल्याच्या कारणामुळे बिग बॉसने घराबाहेर हकालपट्टी केलेल्या स्वामी ओमने बाहेर पडताच बिग बॉस तसेच सलमान खानवर आरोपांची बरसात केली. सलमानला मारहाण करणार तसेच बिग बॉसचे घर पेटवून देणार असे बेछूट वक्तव्य करणाºया स्वामी ओमने ग्रॅण्ड फिनालेमध्ये गोंधळ घालणार असल्याची धमकीही दिली होती; मात्र हाती आलेल्या माहितीनुसार आता स्वामी ओमच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांना पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. 

वास्तविक महिलांच्या अधिकारासाठी लढणाºया एका महिलेने स्वामी ओमवर गुन्हा दाखल केला आहे. टीना शर्मा असे नाव असलेल्या या महिलेने दिल्ली येथील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी टीनाने आरोप केला की, स्वामी ओम यांनी रिअ‍ॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये महिलांविरोधात आपत्तीजनक आणि अश्लील वक्तव्य केले आहे. स्वामी ओमला घराबाहेर काढल्यानंतर बिग बॉसच्या एका टीव्ही मुलाखतीत स्वामी ओमने घरातीलच एका महिला स्पर्धकाविषयी अश्लील व्यक्त करून, सबंध स्त्रीजातीला बदनाम करण्याचा प्र्रयत्न केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

घराबाहेर हकालपट्टी केल्यानंतर स्वामी ओम माध्यमांमध्ये वाट्टेल ते बोलत आहेत. कधी धमकी तर कधी आरोपांची ते बरसात करीत आहेत. विशेष म्हणजे मिनिटा-मिनिटाला त्यांचे वक्तव्य बदलत असल्याने त्यांच्या बोलण्यात कितपत तथ्यता आहे, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार व स्वामी ओम यास कशा पद्धतीने उत्तर देणार हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: Bigg Boss: ... finally filed a complaint against Swami Om

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.