'बिग बॉस'शो स्पर्धकाने मध्येच सोडला तर भरावा लागतो इतक्या कोटींचा दंड, कोणताही सेलिब्रेटी हिंमत करतच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 01:47 PM2021-02-06T13:47:37+5:302021-02-06T13:50:09+5:30

म्हणूनच 'बिग बॉस'चा शो अर्धवट सोडणं कुणालाही परवडण्यासारखं नाही. हा शो मध्येच सोडल्यास घरातील सदस्याला त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते. 

Bigg Boss Contestants will have to pay a penalty of Rs 2 crore to quit show | 'बिग बॉस'शो स्पर्धकाने मध्येच सोडला तर भरावा लागतो इतक्या कोटींचा दंड, कोणताही सेलिब्रेटी हिंमत करतच नाही

'बिग बॉस'शो स्पर्धकाने मध्येच सोडला तर भरावा लागतो इतक्या कोटींचा दंड, कोणताही सेलिब्रेटी हिंमत करतच नाही

googlenewsNext

'बिग बॉस'च्या घरात राहणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस घरातील सदस्यांसाठी जणू अग्निपरीक्षाच असते. इथले टास्क आणि वादावादी याला कंटाळून घरातील सदस्य वारंवार घर सोडून जाण्याच्या वल्गना करतात. याआधीच्या प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकानं अशी धमकी दिलीच आहे. मात्र कोणताही स्पर्धक घर सोडण्याची हिंमत करत नाही. कारण बिग बॉसचा शो अर्धवट सोडणं कुणालाही परवडण्यासारखं नाही. हा शो मध्येच सोडल्यास घरातील सदस्याला त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते. 

 

'बिग बॉस'मध्ये येण्याआधी स्पर्धक आणि वाहिनीमध्ये एक करार झालेला असतो. या करारानुसार शो मध्येच सोडल्यास २ कोटींचा दंड संबंधित स्पर्धकाला द्यावा लागू शकतो.  बिग बॉसच्या घरातील अनेक सिक्रेट्सही आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. 

घरातील सदस्यांना स्वतः साफसफाई करावी लागते. मात्र सगळे स्पर्धक झोपल्यानंतर घराचा दर्जा उत्तम दिसावा आणि स्वच्छता कायम राहावी यासाठी मध्यरात्रीनंतर घरात गुप्तपणे साफसफाई करण्यात येते. जेणेकरुन घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसावा. याशिवाय 'विकेंडचा वार' या भागात घरातील सदस्यांसाठी सलमानच्या घरचं खास जेवण येतं अशाही चर्चा रंगतात. 

तसंच बिग बॉसच्या घरात झोपण्याच्या आणि सकाळी उठण्याची वेळही वेगवेगळी असते. रात्री उशिरापर्यंत शुटिंग सुरु राहिल्यास दुसऱ्या दिवशी स्पर्धकांना उशिरा उठवलं जातं. सूर्य कुठे आहे यावरुन घरातील सदस्य अंदाज लावतात की सकाळचे अकरा वाजले की दुपारचे १२.

Bigg Boss 14चं घर आहे खूप आलिशान, फोटो पाहून व्हाल हैराण, See Photos

इतर सिझनप्रमाणे यंदाचे बिग बॉसचे घरही आलिशान पद्धतीने डकोरेट करण्यात आले आहेत.  बाथरुमची थीम अंडरवॉटर आहे. यात ग्रीन रंगाचा जास्त वापर करण्यात आला आहे.बिग बॉसचे कन्फेशन रुमला डायमंड शेप देण्यात आला आहे आणि ड्रामेटिक टच देण्यात आला आहे.स्पर्धकांचा बेडरुम यंदा कलरफुल ठेवण्यात आला आहे.यंदाच्या सिझनमध्ये आणि इतर सिझनमध्ये फरक इतकाच आहे की, बिग बॉस १४ शोचा सेट गोरेवाच्या फिल्मसिटीमध्येच उभारण्यात आला आहे. आत्तापर्यंतचे सर्व सिझन हे लोनावळ्याच्या सेटवर झाले होते. 

Web Title: Bigg Boss Contestants will have to pay a penalty of Rs 2 crore to quit show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.