निम्की मुखियातील अभिनेत्री भूमिका गुरुंगचे वाढले नखरे !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 09:38 AM2018-05-08T09:38:25+5:302018-05-08T15:08:25+5:30

टीव्हीच्या पडद्यावर आपण जास्तीत जास्त काळ दिसावे आणि मालिकेतील आपल्या भूमिकेला जास्त वाव मिळावा, यासाठी नखरे करणाऱ्या आणि निर्मात्यांना त्रास ...

Bigg Boss actress role Gurung grew up! | निम्की मुखियातील अभिनेत्री भूमिका गुरुंगचे वाढले नखरे !

निम्की मुखियातील अभिनेत्री भूमिका गुरुंगचे वाढले नखरे !

googlenewsNext
व्हीच्या पडद्यावर आपण जास्तीत जास्त काळ दिसावे आणि मालिकेतील आपल्या भूमिकेला जास्त वाव मिळावा, यासाठी नखरे करणाऱ्या आणि निर्मात्यांना त्रास देणाऱ्या नायिकांच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. सर्वच मालिका आणि कलाकारांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे प्रत्येक कलाकारापुढे प्रेक्षकांच्या नजरेसमोर राहण्याची स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे कलाकार असे नखरे करतात, हे आपण समजू शकतो. पण आपले वजन वाढल्यामुळे सेटवर नखरे करणाऱ्या नायिकेबद्दल तुम्ही ऐकले आहे काय?

अशी घटना ‘स्टार भारत’ वाहिनीवरील ‘निम्की मुखिया’ मालिकेच्या सेटवर घडली कारण या मालिकेतील निम्कीची
मध्यवर्ती भूमिका रंगविणाऱ्या भूमिका गुरुंगच्या वाढलेल्या वजनामुळे निर्माते काहीसे चिंतेत पडले होते. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेत एक फ्लॅशबॅकचा प्रसंग चित्रीत होणार होता आणि त्यासाठी भूमिका आपल्या लग्नापूर्वीच्या रूपात दिसणे आवश्यक होते. पण दरम्यानच्या काळात भूमिकाचे वजन वाढले असल्याने तिला निर्मात्यांनी दिलेले तिच्या सुरुवातीच्या काळातील कपडे परिधान करता येत नव्हते. यामुळे त्रासलेल्या भूमिकाने निर्मात्यांना हैराण करून सोडले आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा प्रसंगच मालिकेतून रद्द करून टाकला!

निम्की मुखिया’ मालिकेत ‘ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी’ (बीडीओ) अभिमन्यू सिंहची भूमिका रंगविणारा अभिनेता इंद्रनील सेनगुप्ताची भूमिका चांगल्या वाटेवर सुरू झाली.त्याला निम्कीचा मार्गदर्शक असल्याचे दाखविले जात होते.तसेच तो निम्कीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे सूचित केले जात होते.यथावकाश त्याच्या व्यक्तिरेखेचाही विकास केला जाईल आणि त्याच्या प्रेमाच्या दृष्टिकोनाचा विस्तार केला जाईल, असे त्याला सांगण्यात आले होते. पण तसे काहीच घडले नाही. आता तर निम्कीचे लग्न बब्बूसिंह याच्याशी होत आहे. परिणामी सुरुवातीला महत्त्वाची वाटत असलेली इंद्रनीलची व्यक्तिरेखा आता दुय्यम ठरत चालली आहे.

Web Title: Bigg Boss actress role Gurung grew up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.