'बिग बॉस १९' ला अखेर मिळाला पहिला कॅप्टन! कुनिका, प्रणित की गौरव... कुणी मिळवला मान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:16 IST2025-08-28T16:13:04+5:302025-08-28T16:16:48+5:30
'बिग बॉस १९'च्या घराची सूत्रं कुणाच्या हाती गेली याची माहिती समोर आली आहे.

'बिग बॉस १९' ला अखेर मिळाला पहिला कॅप्टन! कुनिका, प्रणित की गौरव... कुणी मिळवला मान?
Bigg Boss 19 First Captain: वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस सीझन १९' सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. गेल्या २४ ऑगस्ट रोजी 'बिग बॉस १९'चा प्रिमिअर पार पडला होता. काल 'बिग बॉस'चा चौथा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'बिग बॉस'च्या घरात सुरू असलेली भांडणं, वाद आणि नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. या सगळ्यामध्ये, ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ आला आहे. 'बिग बॉस'च्या १९व्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला आहे. एपिसोड प्रसारित होण्यापूर्वीच 'बिग बॉस १९'च्या घराची सूत्रं कुणाच्या हाती गेली याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये या टास्कची एक झलक पाहायला मिळाली, ज्यात स्पर्धकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं दिसतंय. 'बिग बॉस'ने कॅप्टनसी टास्कसाठी बसीर अलीला जज म्हणून निवडले. ज्याच्या हातात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, कॅप्टनसीच्या या टास्कदरम्यान बसीर अली आणि गौरव खन्ना यांच्यात जोरदार वाद होतो. दोघांमध्ये सुरू असलेल्या या भांडणामुळे घरातील वातावरण तापतं. या गोंधळात एका स्पर्धकाने बाजी मारत कॅप्टनसीचा टास्क जिंकला.
एपिसोड प्रसारित होण्यापूर्वीच, 'बिग बॉस'चं अपडेट्स देणाऱ्या 'द खबरी' या पेजने या सीझनचा पहिला कॅप्टन कोण असेल हे जाहीर केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, अभिनेत्री कुनिका सदानंद ही 'बिग बॉस १९'च्या घराची पहिली कॅप्टन बनली आहे. कुनिका पहिल्या दिवसापासूनच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर तिचं मत बिनधास्तपणे मांडते. त्यामुळे ती कॅप्टन झाल्यास घरात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
'द खबरी'च्या माहितीनुसार, कुनिका पहिली कॅप्टन बनली असली तरी, ही बातमी अधिकृत नाही. लवकरच प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे की, खऱ्या अर्थाने घराची सूत्रं कुणाच्या हातात येतात.