एल्विश यादवचा जिवलग मित्र 'बिग बॉस 17'मध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:59 PM2023-11-09T19:59:20+5:302023-11-09T20:06:28+5:30

'बिग बॉस 17' संदर्भात एक मोठे अपडेट आले आहे.

Bigg Boss 17: Will Elvish Yadav’s BFF Lovekesh Kataria Enter As New Wildcard Contestant | एल्विश यादवचा जिवलग मित्र 'बिग बॉस 17'मध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

एल्विश यादवचा जिवलग मित्र 'बिग बॉस 17'मध्ये घेणार एन्ट्री?

'बिग बॉस 17'  हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम स्पर्धकांमुळे तसेच त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे.  बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. आता यातच 'बिग बॉस 17' संदर्भात एक मोठे अपडेट आले आहे. 

'बिग बॉस 17' मध्ये  टीव्ही आणि फिल्म स्टार्सनंतर सोशल मीडियाच्या दुनियेतील सेलिब्रिटींचा समावेश करण्यात आला आहे. एक लोकप्रिय YouTuber लवकरच सामील होणार असल्याची बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस OTT सीझन 2' चा विजेता एल्विश यादव जवळचा मित्र  लवकेश कटारिया हा बिग बॉस 17 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.बिग बॉस 17 शी संबंधित अपडेट शेअर करणाऱ्या एका फॅन पेजने हे अपडेट दिले  आहे. 

'बिग बॉस 17' चा टीआरपी वाढवण्यासाठी स्पर्धक आणि निर्माते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सलमान खान हा कार्यक्रम होस्ट करत आहे. बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये  अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन, मुन्रवर फारूक,  ईशा मालवीय आणि अभिषेक, समर्थ आणि मन्नारा चोप्रासह इतर काहीकलाकार देखील बिग बॉसच्या घरात लॉक आहेत. 

Web Title: Bigg Boss 17: Will Elvish Yadav’s BFF Lovekesh Kataria Enter As New Wildcard Contestant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.