Bigg Boss 15: शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकत्र, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 11:47 AM2021-11-08T11:47:46+5:302021-11-08T11:49:04+5:30

Bigg Boss 15: अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट सतत चर्चेत येत असतात.

Bigg Boss 15: Rakesh Bapat and Shamita Shetty together in the show, the reaction of the actor's first wife came to the fore | Bigg Boss 15: शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकत्र, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया आली समोर

Bigg Boss 15: शोमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकत्र, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया आली समोर

googlenewsNext

 'बिग बॉस ओटीटी' शोच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आलेले अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट सतत चर्चेत येत असतात. हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर दोघांनी 'बिग बॉस'च्या घरामध्ये त्यांच्या नात्याची कबूली देखील दिली आहे.

आता दोघे 'बिग बॉस १५'मध्ये देखील एकत्र झळकणार आहेत. राकेश बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून एन्ट्री करणार आहे. त्यांच्यासोबत गायक नेहा भसीन देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. दरम्यान, राकेश आणि शमिता पुन्हा एकत्र येत असताना राकेशच्या पहिल्या पत्नीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. 

रिद्धी डोगराचे ट्विट होतंय व्हायरल

राकेश बापटच्या पहिल्या पत्नीचे नाव रिद्धी डोगरा असून तीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर सध्या राकेश आणि शमिताचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडिओवर रिद्धी डोगराने प्रतिक्रिया दिली आहे. रिद्धी म्हणाली, 'चांगल्या प्रकारे खेळा आणि नीट राहा.'. तिचे हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. 

राकेश आणि रिद्धी सामंजस्याने झालेत विभक्त

राकेश आणि रिद्धीने एका संदेशाद्वारे चाहत्यांना ते वेगळे होत असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही हा निर्णय परस्पर आदराने आणि एकमेकांसाठी, आमच्या कुटुंबीयांची काळजी घेऊन घेतला आहे. आम्ही नेहमीच चांगले मित्र असू. पण आता आम्ही जोडपे म्हणून राहणार नाही.
 

Web Title: Bigg Boss 15: Rakesh Bapat and Shamita Shetty together in the show, the reaction of the actor's first wife came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.