ईशान-मायशाला हाकला, थोडी तर लाज बाळगा..., ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:07 IST2021-10-11T16:04:11+5:302021-10-11T16:07:01+5:30
Bigg Boss 15 : होय, ईशान सहगल (Ieshaan Sehgaal) व मायशा अय्यर (Miesha Iyer ) यांचा नॅशनल टीव्हीवरचा रोमान्स पाहून नेटकरी भडकले आहेत.

ईशान-मायशाला हाकला, थोडी तर लाज बाळगा..., ‘Bigg Boss 15’चा प्रोमो पाहून भडकले फॅन्स
‘बिग बॉस’ या शोने पूर्वापार अनेक वाद ओढवून घेतले. आताही या शोचा 15 वा सीझन (Bigg Boss 15)असाच वादात सापडण्याची चिन्हं आहेत. सध्या बिग बॉस 15 एका वेगळ्याच कारणानं ट्रोल होतोय. हे कारण म्हणजे, दोन स्पर्धकांचा रोमान्स. होय, ईशान सहगल (Ieshaan Sehgaal) व मायशा अय्यर (Miesha Iyer ) यांचा नॅशनल टीव्हीवरचा रोमान्स पाहून नेटकरी भडकले आहेत. आठवडाभरातच ईशान व मायशा एकमेकांच्या असे काही जवळ आलेत की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत,याचाही त्यांना विसर पडलेला दिसतोय. बिग बॉसच्या ताज्या प्रोमो तर या दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचं चाहत्यांचं मत झालंय.
कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बिग बॉस 15 एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ईशान आणि मायशा हे दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत. दोघंही एकमेकांना किस करताना, एकमेकांशी इंटिमेट होताना दिसताहेत आणि बॅकग्राऊंडला ‘भीगे ओठ तेरे...,’ हे गाणं वाजतंय. हा प्रोमो पाहून नेटकरी संतापले आहेत.
अशा सगळ्या अश्लिल प्रकार कृपा करून दाखवू नका. आम्ही आमच्या कुटुंबासोबत शो पाहतो, अशी कमेंट एका युजरने केली आहे. एका नेटकºयाने तर हा प्रोमो पाहिल्यानंतर थेट ईशान व मायशाला शोमधून बाहेर हाकलण्याची मागणी केली आहे. काही तर लाज बाळगा, अशी संतप्त प्रतिक्रिया एका चाहत्याने केली आहे.
सेन्सॉर बोर्ड कुठे आहे. फॅमिली शोला अश्लील शो बनतोय. ही अमेरिका नाही भारत आहे, थोडीतर लाज ठेवा, अशी प्रतिक्रियाही एका नेटक-याने दिली आहे.