Bigg Boss 14 winner रुबीना दिलैकवर आली स्वत:चं राहतं घर विकण्याची वेळ, झाली लाखोंची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 01:47 PM2021-12-13T13:47:24+5:302021-12-13T19:43:38+5:30

रुबीनाने दिलैक(Rubina dilaik) ने आपल्या करिअरची सुरुवात झी टीव्हीवरीर 'छोटी बहू' मालिकेने केली होती.

Bigg boss 14 winner rubina dilaik revealed she was cheated of 16 lakhs by a producer | Bigg Boss 14 winner रुबीना दिलैकवर आली स्वत:चं राहतं घर विकण्याची वेळ, झाली लाखोंची फसवणूक

Bigg Boss 14 winner रुबीना दिलैकवर आली स्वत:चं राहतं घर विकण्याची वेळ, झाली लाखोंची फसवणूक

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सीझन 14 (bigg boss 14 winner)ची विजेती रुबिना दिलैक (Rubina dilaik)ने खुलासा केला की 2011 मध्ये एका निर्मात्याने तिची 16 लाखांची फसवणूक केली होती, ज्यामुळे अभिनेत्रीवर तिचे घर आणि दोन गाड्या विकण्याची आली होती वेळ. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, प्रॉडक्शन हाऊसने शूटिंगला उशीर झाल्यामुळे झालेल्या नुकसानाबाबत दाखवलेले सर्व रेकॉर्ड खोटे होते. मात्र अभिनेत्री तिच्या कमिटमेंटमुळे  मजबूर होती, त्यामुळे तिला इतके मोठे पाऊल उचलावे लागले.

रुबीनाने दिलैकने आपल्या करिअरची सुरुवात झी टीव्हीवरीर 'छोटी बहू' मालिकेने केली होती. या मालिकेत तिने राधिकाची भूमिका साकारली होतीय यानंतर रुबीना 'शक्ति:अस्तित्व के एहसास की’ मालिकेत दिसली. या मालिकेने रुबीला खरी ओळख मिळाली. रुबिनाने  'बिग बॉस 14' मध्ये भाग घेतला आणि ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. या शोनंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

 झालेल्या फसवणुकीबद्दल बोलताना रुबीनाने 'बॉलिवुड बबल'शी बोलताना सांगितले की, 2011 मध्ये तिचे पैसे अनेक महिन्यांपासून थकवले होते. नऊ महिन्यांनंतर, काय होत आहे हे समजून घेण्यासाठी तिने निर्मात्याला फक्त एकदा भेटण्याची विनंती केली. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, प्रॉडक्शन हाऊसने शूटिंगला उशीर झाल्यामुळे झालेल्या नुकसानाचे रेकॉर्ड दाखवले, ज्यामध्ये 16 लाखांची थकबाकी दाखवण्यात आली होती. याबद्दल सविस्तर माहिती देताना रुबिना पुढे म्हणते, “२०११ मध्ये माझ्या अपलिंकची किंमत १६ लाख होती, पण खरे सांगायचे तर, रेकॉर्डवर दाखविलेल्या घटनांपैकी एकही घटना खरी नव्हती. रेकॉर्डमध्ये एकूण नऊ घटनांची नोंद करण्यात आली होती, जे खरे नव्हते.
 

Web Title: Bigg boss 14 winner rubina dilaik revealed she was cheated of 16 lakhs by a producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.