Bigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...
By गीतांजली | Updated: September 24, 2020 20:02 IST2020-09-24T19:50:40+5:302020-09-24T20:02:00+5:30
बिग बॉसच्या या सीझनचे सूत्रसंचालन सुद्धा सलमान खान करणार आहे.

Bigg Boss 14: सलमान खानने व्यक्त केली मानधनात कपात करण्याची इच्छा, म्हणाला...
कोव्हिड-19 नंतर आता हळुहळु जनजीवन रुळावर येतेय. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचा ही यात समावेश आहे. छोट्या पडद्यावरील हिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस14'ची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघतायेत. गेल्या अनेक दिवसांपासून या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची चर्चा आहे. आता या नावावरुन 3 ऑक्टोबरला पडद्या उठणार आहेे. 3 ऑक्टोबरला या शोचे प्रिमिअर होणार आहे. त्याआधी या शोची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सलमान खानही दिसला.
दरवेळे प्रमाणे बिग बॉसच्या या सीझनचे सूत्रसंचालन सुद्धा सलमान खान करणार आहे. या शोचे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खान मोठी फिस घेतो. मात्र यावेळी सलमान खान त्याच्या मानधनात कपात करण्यासाठी तयार आहे. सलमान म्हणाला, टीममधील इतरांना संपूर्ण मानधन पूर्ण मिळण्यासाठी तो स्वत:च्या मानधनात कपात करण्यास तयार आहे. शोच्या निर्मात्यांशी बोलताना सलमान म्हणाला,माझे मानधन कमी केली तर मला आनंद होईल जेणेकरून टीम मधील इतर लोकांना त्यांचा पगार मिळू शकेल.
सलमान खान करणार बिग बॉस 14चे सूत्रसंचालन
रिपोर्टनुसार, बिग बॉस 14चे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमानला 250 कोटी दिले आहेत. सलमान आठवड्यातून एकदा शोच्या दोन भागांसाठी शूटिंग करणार आहे. 12 आठवड्यांसाठी सलमानला प्रत्येक भागासाठी 10.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका आठवड्यात दोन भागांसाठी सलमानला 20.50 कोटी रुपये मिळतील.
बिग बॉस 14 घरातील फोटो लीक, आलिशान आहे बेडरुमपासून ते लिव्हिंग रुम