Bigg Boss 13: 'बिग बॉस'च्या घरात जाऊन दुसरं लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने घेतले सर्वाधिक मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 16:30 IST2019-09-27T16:30:06+5:302019-09-27T16:30:32+5:30
'बिग बॉस'च्या घरात जाऊन ही अभिनेत्री दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Bigg Boss 13: 'बिग बॉस'च्या घरात जाऊन दुसरं लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने घेतले सर्वाधिक मानधन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा १३ वा सीझन येत्या रविवारी (ता. २९ सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळेसच्या सीझनमध्ये फक्त सेलिब्रेटीज असणार आहेत. त्यामुळे यावेळेसच्या भागात वेगळेपण पहायला मिळणार आहे. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार या सीझनमध्ये रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, देवोलीना भट्टाचार्जी, दयानंद शेट्टी, कोएना मित्रा व दलजीत कौर यांच्यासारखे बरेच कलाकार बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहेत.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी रश्मी देसाईला बाकीच्या स्पर्धकांपेक्षा जास्त मानधन देण्यात आलं आहे. असं वृत्त आहे की रश्मी बॉयफ्रेंड अरहान खानसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. या घरात जाण्यासाठी रश्मीने १.२ कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्रीची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी शोचे मनोरंजन वाढवण्यासाठी बिग बॉसच्या घरात सहभागी केलं आहे.
याच कारणामुळे तिला जास्त मानधन देण्यात आलं आहे. बिग बॉसच्या बाराव्या सीझनला प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे यावेळी शोमध्ये बदल करण्यात आला आहे.
बिग बॉसचा सीझन १३ येत्या शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे आणि इतर दिवशी रात्री साडे दहा वाजता प्रेक्षकांना हा शो पहाता येणार आहे.