Bigg Boss 12: अनुप जलोटा यांनी श्रीसंतबद्दल केले हे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 13:04 IST2018-09-27T12:59:26+5:302018-09-27T13:04:29+5:30
भजनसम्राट अनुप जलोटा यांनी श्रीसंतवर टीका केली. अनुप जलोटा म्हणाले की त्याच्या नाकावर नेहमी राग असतो.

Bigg Boss 12: अनुप जलोटा यांनी श्रीसंतबद्दल केले हे वक्तव्य
बिग बॉस१२मध्ये पहिला लग्झरी बजेट टास्क सिंगल व्यक्तींनी जिंकले. या टास्कनंतर सिंगल व्यक्ती व जोड्यांमध्ये मतभेद खूप वाढताना दिसले होते. त्यामुळे घरातील वातावरण खूप बदलले. या टास्कमध्ये श्रीसंथने सहभाग घेतला नव्हता. कारण त्याची तब्येत ठीक नव्हती. याच दरम्यान भजनसम्राट अनुप जलोटा यांनी त्याच्याबद्दल असे वक्तव्य केले ज्यामुळे श्रीसंतच्या चाहत्यांना वाईट वाटले असेल.
जेव्हापासून बिग बॉसच्या घरात श्रीसंतची एन्ट्री झाली आहे. तेव्हापासून तो जास्त रागात असतो आणि आता तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला कोणत्याही टास्कमध्ये सहभागी होता आले नाही. यावेळी लग्झरी बजेट टास्कमध्ये समुद्री लुटेरेचा टास्क देण्यात आला होता. त्यात सिंगल व जोड्यांनी सहभाग घेतला होता.या टास्कनंतर घरातील सर्वजण आपापसात बोलत होते. त्यावेळी अनुप जलोटा यांनी श्रीसंतच्या या शोमध्ये सहभाग घेण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
अनुप जलोटा, जसलीन, रोशमी व सबा एकत्र बसले होते. त्यावेळी अनुप जलोटा म्हणाले की तुम्हाला असे वाटत नाही का श्रीसंतमुळे एक सीट वाया गेली आहे. त्यावेळी रोशमी म्हणाली की, तो आपली प्रतिमा सुधारण्यासाठी या शोमध्ये सहभागी झाला आहे. यावर अनुप जलोटा म्हणाले की त्याच्या नाकावर नेहमी राग असतो. अनुप जलोटाच्या या वक्तव्याला रोशमी व जसलीन दोघेही समर्थन करतात. आता श्रीसंत बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.