मुलीच्या आजारपणामुळे झाला उशीर, निर्मात्यांनी दिला डच्चू! करणवीर बोहराने सांगितली आपबीती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:55 AM2019-04-17T11:55:15+5:302019-04-17T11:58:00+5:30

‘बिग बॉस 12’ फेम करणवीर बोहरा याला एका शोमधून ऐनवेळी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. होय, मुलीच्या आजारपणामुळे करणवीरला सेटवर पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि तिकडे निर्मात्यांनी त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला.

bigg boss 12 fame karanvir bohra dropped from the show due to this reason | मुलीच्या आजारपणामुळे झाला उशीर, निर्मात्यांनी दिला डच्चू! करणवीर बोहराने सांगितली आपबीती!!

मुलीच्या आजारपणामुळे झाला उशीर, निर्मात्यांनी दिला डच्चू! करणवीर बोहराने सांगितली आपबीती!!

googlenewsNext
ठळक मुद्देकरणवीर बोहराने शरारत, क्योंकी साँस भी कभी बहू थी, जस्ट मोहोब्बत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती कसोटी जिंदगी की या मालिकेमुळे.

‘बिग बॉस 12’ फेम करणवीर बोहरा याला एका शोमधून ऐनवेळी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. होय, मुलीच्या आजारपणामुळे करणवीरला सेटवर पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि तिकडे निर्मात्यांनी त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला. करणवीरने सोशल मीडियावर ही आपबीती सांगितली आहे.
‘आयुष्यात कधी कधी आणीबाणीचे क्षण येतात. मुल अचानक आजारी पडतात आणि यामुळे सेटवर पोहोचायला उशीर होतो. माझ्यासोबतही हेच घडले आणि शोच्या निर्मात्यांनी मला शोमधून बाहेर केले. हा प्रकार निश्चितपणे असंवेदशील आहे. इतक्या वर्षांत प्रथमच माझ्यासोबत असे काही घडले. एक अभिनेता असण्यासोबतच मी एक पिता आहे. आणीबाणीच्या स्थितीत मी माझ्या मुलींना पत्नी वा नोकरांच्या भरवशावर सोडू शकत नाही. आज सकाळी माझ्या मुलीला माझी गरज होती. ती माझी प्राथमिकता होती. शेड्यूल डिस्टर्ब झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रॉडक्शन हाऊस / चॅनलची माफी मागतो. पण अनेकदा आम्हाला प्रतीक्षा करवली जाते. अनेकदा आम्ही तडजोड स्वीकारतो. आम्हा कलाकारांनाही अशीच सवलत मिळाली तर चांगले होईल,’ असे करणवीरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.


करणवीर बोहराने शरारत, क्योंकी साँस भी कभी बहू थी, जस्ट मोहोब्बत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती कसोटी जिंदगी की या मालिकेमुळे. या मालिकेत त्याने साकारलेली प्रेमची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच नच बलिये, झलक दिखला जा यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील तो झळकला आहे. २००६ मध्ये मॉडेल तीजे सिंधूसोबत त्याचे लग्न झाले. दोघांनाही बेला आणि विएना नावाच्या दोन जुळ्या मुली आहेत.

Web Title: bigg boss 12 fame karanvir bohra dropped from the show due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.