Bigg Boss 11 Winner : असा होता शिल्पा शिंदेचा 'बिग बॉस'च्या घरातला प्रवास.. जाणून घेण्यासाठी क्लिक करा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 05:02 AM2018-01-15T05:02:56+5:302018-01-15T11:31:50+5:30

महाराष्ट्राची मुलगी शिल्पा शिंदेने बिग बॉस 11चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. ती आली तिने पाहिले आणि तिने जिंकलं ...

Bigg Boss 11 Winner: This was Shilpa Shinde's 'Big Boss' trip to home. Click to know! | Bigg Boss 11 Winner : असा होता शिल्पा शिंदेचा 'बिग बॉस'च्या घरातला प्रवास.. जाणून घेण्यासाठी क्लिक करा !

Bigg Boss 11 Winner : असा होता शिल्पा शिंदेचा 'बिग बॉस'च्या घरातला प्रवास.. जाणून घेण्यासाठी क्लिक करा !

googlenewsNext
ाराष्ट्राची मुलगी शिल्पा शिंदेने बिग बॉस 11चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. ती आली तिने पाहिले आणि तिने जिंकलं असेच काहीसे झाले बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिदेंच्या बाबतीत. 19 प्रतिस्पर्धींना मागे टाकून शिल्पाने मजल मारली आहे.  शिल्पा शिंदे आणि हिना खानमध्ये अटीतटीचा सामना झाला. मात्र अखेर बाजी अंगुरी भाभीनेच मारली. 'भाभाजी घर पर' है म्हणत शिल्पाने याआधीच रसिकांची मनं जिंकली होती. हा शो जिंकणारी शिल्पा पहिली मराठमोळी विजेती ठरली आहे. 'बिग बॉस सीझन 11च्या  सुरुवातीपासून शिल्पा या विजेती पदाची प्रबळ दावेदार समजली जात होती. विजेते पद स्वीकारताना शिल्पा काहीशी भावूक झालेली दिसली. शिल्पा ट्रॉफी आणि 44 लाखांचा धनादेश देण्यात आला. शिल्पा बिग बॉसचे विजेतेपद जिंकणारी पाचवी महिला विजेती ठरली आहे.  शिल्पाच्या नावाने काही दिवसांपूर्वी वुई लव्ह शिल्पा शिंदे असा हॅशटॅग तिच्या चाहत्यांनी तयार केला होता. या हॅशटॅगचा वापर करत तिच्या फॅन्सने तिला अनेक ट्वीट केले होते. तिच्या फॅन्सने केलेल्या ट्वीटची संख्या एक दक्षलक्षाहून देखील जास्त होती आणि त्यामुळेच वुई लव्ह शिल्पा शिंदे हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंडिंग मध्ये देखील आला होता. कोणताही टिव्ही कलाकार इतक्या ट्वीटमुळे ट्रेंडिंग मध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याचमुळे शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर एक रेकॉर्ड रचला होता.

ALSO READ :   Bigg Boss 11 Winner : अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदेला विजेती घोषित करताच असा केला जल्लोष!


शिल्पाचा बिग बॉसमधला प्रवास रंजक होता. शोच्या सुरुवातीला शिल्पा आणि विकास गुप्ताचे भांडण हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर शिल्पा नीट हिंदी आणि इंग्लिश वाचता येत नाही म्हणून तिची टिंगल उडवली गेली होती. मात्र शिल्पाने हार मानली नाही. तिने किचनचा ताबा घेत स्पर्धकांबरोबर प्रेक्षकांची ही मनं जिंकली. विशेष म्हणजे शिल्पाने या घरात कधी अभिनेत्री होण्याचा तोरा मिरवला नाही. ती एक सर्वसामान्यांप्रमाणेच वागली म्हणूनच तिला शिल माँ अशी ओळख हि मिळाली. बिग बॉस 11चे विजेतेपद जिंकल्यानंतर शिल्पाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत ती विविध माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा करुया.   

Web Title: Bigg Boss 11 Winner: This was Shilpa Shinde's 'Big Boss' trip to home. Click to know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.