Bigg Boss 11 : घराबाहेर पडताच ज्योती कुमारीने केला खळबळजनक खुलासा, ‘या’ स्पर्धकाला म्हटले, ‘धुर्त अन् गलिच्छ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 18:42 IST2017-10-31T13:10:18+5:302017-10-31T18:42:19+5:30

बिग बॉसच्या चौथ्या आठवड्यात बिहारमधील मासौढी या छोट्याशा गावातून आलेल्या कॉमनर ज्योती कुमारी हिला घराबाहेर पडावे लागले. घराबाहेर पडताच ...

Bigg Boss 11: When Jyoti Kumari came out of the house, it was unbelievable, 'The' said the contestant, 'Dhupta and dirty'! | Bigg Boss 11 : घराबाहेर पडताच ज्योती कुमारीने केला खळबळजनक खुलासा, ‘या’ स्पर्धकाला म्हटले, ‘धुर्त अन् गलिच्छ’!

Bigg Boss 11 : घराबाहेर पडताच ज्योती कुमारीने केला खळबळजनक खुलासा, ‘या’ स्पर्धकाला म्हटले, ‘धुर्त अन् गलिच्छ’!

ग बॉसच्या चौथ्या आठवड्यात बिहारमधील मासौढी या छोट्याशा गावातून आलेल्या कॉमनर ज्योती कुमारी हिला घराबाहेर पडावे लागले. घराबाहेर पडताच ज्योतीने एक मोठा अन् खळबळजनक खुलासा केला आहे. तिने एका मुलाखतीत  म्हटले की, सपना चौधरी घरातील सर्वांत धुर्त आणि घाणेरडी आहे. ज्योतीच्या मते, ‘सपना बºयाचदा असे काही बोलून जाते ज्यामुळे लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नसते. मी बिग बॉसच्या घरात जवळपास एक महिना राहिले. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला सध्या खूपच वाईट वाटत आहे. कारण त्याठिकाणी बरेचसे असे स्पर्धक आहेत, ज्या माझ्यापेक्षा खूप कमजोर आहेत. मात्र प्रेक्षकांनी मला घराबाहेर काढले. परंतु अशातही मी बिग बॉसच्या घरातील प्रत्येक क्षण एन्जॉय केला. मग खरीखुरी दोस्ती करणे असो, वा भांडण यामध्ये मी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. 

पुढे बोलताना ज्योतीने म्हटले की, ‘मला माहिती होते की, माझे इलीमिनेशन होणार. कारण एका लहानशा गावातून आले आहे. त्याचबरोबर मी काही मोठी सेलिब्रिटीदेखील नाही. खरं तर मी जास्त गुडलूकिंग नाही अन् बिग बॉसमधील इतर स्पर्धकांप्रमाणे स्मार्टही नाही. प्रेक्षक सुंदर मुलींना बघणे पसंत करतात. लहानपणापासून माझे दोन स्वप्न होते. एक तर मला असे वाटायचे की, मी टीव्हीवर झळकायला हवे अन् दुसरे म्हणजे मला अभिनेत्री बनायचे. त्यातील एक स्वप्न आता पूर्ण झाले आहे. आता मी दुसरे स्वप्न पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मी या शोला खूप मिस करणार आहे. 



ज्योती कुमारी शोच्या बाहेर होताच सपना चौधरी, शिल्पा शिंदे, आकाश ददलानी, विकास गुप्ता, बेनाफशा सुनावाला आणि लव त्यागी सेफ झाले आहेत. ज्योती रिअल लाइफमध्ये एका गरीब परिवारातून आहे. तिचे वडील शिपाई म्हणून काम करतात. ज्योती शिक्षणात खूप हुशार असून, तिने दहावी आणि बारावी क्लासमध्ये टॉप केले आहे. त्यानंतर तिने दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ज्याठिकाणी तिने इतिहास याविषयात पद्वीचे शिक्षण घेतले. ज्योतीला आयएएस बनायचे आहे. 

Web Title: Bigg Boss 11: When Jyoti Kumari came out of the house, it was unbelievable, 'The' said the contestant, 'Dhupta and dirty'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.