Bigg Boss 11 : बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यामुळे अर्शी खानचे रडून रडून झाले हाल, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:27 IST2017-12-27T10:57:33+5:302017-12-27T16:27:54+5:30

बिग बॉस सीजन ११ मधून गेल्या आठवड्यात घराबाहेर पडलेल्या अर्शी खानच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये रडून रडून तिचे हाल झाल्याचे दिसून येत आहे.

Bigg Boss 11: Arshi Khan is crying because of Bigg Boss house, see video! | Bigg Boss 11 : बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यामुळे अर्शी खानचे रडून रडून झाले हाल, पाहा व्हिडीओ!

Bigg Boss 11 : बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यामुळे अर्शी खानचे रडून रडून झाले हाल, पाहा व्हिडीओ!

रामा क्वीन अर्शी खान बिग बॉसच्या घराबाहेर पडली असून, हिना खान आणि शिल्पा शिंदेसोबत तिने अखेरच्या दिवसांमध्ये घातलेला वादच त्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. बिग बॉस सीजन ११ च्या सुरुवातीला हिना खान, शिल्पा शिंदे आणि अर्शी खान विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात होते. त्यातच ज्या पद्धतीने अर्शी खानने घरात आपले जलवे दाखविले त्यावरून तिला शोच्या अखेरपर्यंत जाण्यास कोणीच रोखू शकत नाही अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र हिना आणि शिल्पासोबत तिने घातलेला वाद चाहत्यांना फारसा पसंत आला नसल्यानेच तिला घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे आता बोलले जात आहे. त्याचबरोबर अर्शीला घराबाहेर काढण्यास विकास गुप्ता हादेखील तेवढाच कारणीभूत असल्याची शक्यता आहे. 

मात्र चर्चा काहीही रंगत असली तरी विकासने अर्शीसोबतची मैत्री अखेरपर्यंत पार पाडली यातही काही शंका नाही. दरम्यान, घराबाहेर पडल्यानंतर अर्शीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती जोरजोरात रडताना दिसत आहे. तसेच घरातील तिचा मित्र विकास गुप्ताची तिला आठवण येत असल्याच सांगत आहे. त्याचबरोबर व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला विकास गुप्ता सपोर्ट करण्यासही आवाहन करीत आहे. 
 

वास्तविक अर्शी खान जोपर्यंत या शोमध्ये होती तोपर्यंत तिने घरात खूपच चांगल्या पद्धतीने गेम खेळला. आपल्या जलव्यांनी तिने प्रेक्षकांना घायाळ केले होते. अर्शीची नाइटी तर प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. हितेन तेजवानीबरोबरचे तिचे संबंध प्रचंड चर्चेत राहिले. त्यामुळे ती या शोची विनर ठरू शकते अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र मध्येच एविक्शनमध्ये घराबाहेर पडावे लागल्याने तिच्या चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असेल यात शंका नाही. 

Web Title: Bigg Boss 11: Arshi Khan is crying because of Bigg Boss house, see video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.