Bigg Boss 11 : ‘या’ अभिनेत्रीला हिना खानच्या कानाखाली माराविशी वाटते चापट, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 19:47 IST2017-10-31T14:17:19+5:302017-10-31T19:47:19+5:30

काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात स्पर्धक हिना खान हिने साउथ चित्रपटातील अभिनेत्रींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. घरातील एका ...

Bigg Boss 11: 'The actress' seems to be hit by Marwija under the voice of Hina Khan, but why? | Bigg Boss 11 : ‘या’ अभिनेत्रीला हिना खानच्या कानाखाली माराविशी वाटते चापट, पण का?

Bigg Boss 11 : ‘या’ अभिनेत्रीला हिना खानच्या कानाखाली माराविशी वाटते चापट, पण का?

ही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात स्पर्धक हिना खान हिने साउथ चित्रपटातील अभिनेत्रींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. घरातील एका सदस्यासोबत चर्चा करताना हिनाने म्हटले होते की, ‘साउथच्या अभिनेत्री खूपच स्थूल असतात.’ हिनाचे हे वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी हिला चांगलेच झोंबले असून, ती हिनावर चांगलीच संतापली आहे. हंसिकानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने हिनावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून, तिच्या चक्क श्रीमुखात भडकाविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

होय, ‘शादी में जरूर आना’ची अभिनेत्री कृती खरबंदा ही हिना खानच्या या वक्तव्यामुळे प्रचंड नाराज झाली आहे. हिनाच्या या वक्तव्याला उत्तर देताना कृतीने म्हटले की, ‘या अगोदर मी हिनाचा खूप आदर करीत होती. कारण टीव्ही इंडस्ट्रीत हिना खान खूप मोठे नाव आहे. मात्र याचा अर्थ तुम्ही अशापद्धतीने इतरांविषयी बोलू शकत नाही. तू माझ्याकडे बघू शकतेस. मीदेखील साउथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मला असे वाटते की, या गोष्टी जाहीरपणे टीव्हीवर बोलण्यासारख्या नाहीत. आश्चर्य तर या गोष्टीचे वाटत आहे की, एक अभिनेत्री दुसºया अभिनेत्रींबद्दल असे म्हणूच कशी शकते. 

पुढे बोलताना कृती म्हणते की, ‘मी खूप वेडी आहे, शिवाय तिच्या या वक्तव्यामुळे प्रचंड रागातही आहे. मी तिच्या या स्टेटमेंटला अजिबातच सपोर्ट करू इच्छित नाही. या इंडस्ट्रीमध्ये तमन्ना, काजल अग्रवालसारख्या अभिनेत्री आहेत. भूमिका बघून आम्ही आमचे वजन कमी अथवा वाढवित असतो. यासाठी तुम्हाला कोणी सुळावर चढवित नाहीत.’ कृती एवढ्यावरच थांबली नाही, पुढे तिने हिनाचा समाचार घेताना म्हटले की, ‘हिनाचे हे वक्तव्य माझ्या मनावर आघात करणारे आहे. कारण तुम्ही इंडस्ट्रीबद्दल असे काहीही म्हणू शकत नाही. मला माफ करा, परंतु जर तिला तिच्या प्रोजेक्ट कॅरेक्टरबद्दल वजन वाढविण्यास सांगितले तर ती वजन वाढविणार नाही का? त्यामुळे तिच्या या वक्तव्यामुळे मला तिच्या कानाखाली माराविशी वाटत आहे. 

कृतीचा हा संताप पाहता हे प्रकरण आता कुठपर्यंत जाणार हे बघणे मजेशीर ठरणार आहे. दरम्यान, हिनाच्या या वक्तव्याचा साउथ इंडस्ट्रीमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Bigg Boss 11: 'The actress' seems to be hit by Marwija under the voice of Hina Khan, but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.