बाबो ! 'बिग बॉस' राखीवर फुल्ल ऑन फिदा, चक्क भेट म्हणून दिली इतक्या लाखांची कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:08 PM2021-03-30T12:08:49+5:302021-03-30T12:17:22+5:30

Rakhi Sawant captured complete show due to her performance in Big Boss season 14. राखी सावंतचा प्रवास सर्वात रंजक राहिला.

Bigboss Impressed by Rakhi Sawant's performance gifter her this... | बाबो ! 'बिग बॉस' राखीवर फुल्ल ऑन फिदा, चक्क भेट म्हणून दिली इतक्या लाखांची कार

बाबो ! 'बिग बॉस' राखीवर फुल्ल ऑन फिदा, चक्क भेट म्हणून दिली इतक्या लाखांची कार

googlenewsNext

राखी सावंत सध्या आज मैं उपर आसमा नीचे अशीच तिची अवस्था झाली असणार.कारण ड्रामा क्विन राखीला बिग बॉस कडून चक्क २५ लखांची गाडीच भेटमध्ये मिळाली आहे.खुद्द राखीनेच व्हिडिओद्वारे गुड न्यूज दिली आहे.त्यामुळे सध्या राखी भलतीच खुश आहे.

शोमध्ये राखी सावंतचा प्रवास सर्वात रंजक राहिला. तिनं रसिकांचे तुफान मनोरंजन केलं आणि शोच्या अखेरीस तिला खुद्द बिग बॉसनेच एंटरटेनमेंट क्वीन म्हटलं होतं. बिग बॉस कडून मिळणारे प्रेम पाहून राखी भावूक झाली होती.

राखी बिग बॉसची विजेती होऊ शकली नसली तरी १४ लाखांची रक्कम घेऊन या शोमधून बाहेर पडली होती.

विशेष म्हणजे राखी सावंत आणि बिग बॉसचं सर्वात जुनं नातं आहे. पहिल्या सीझनची ती स्पर्धक होती. त्यावेळीही राखीला या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. राखीनं चॅलेंजर म्हणून बिग बॉस १४ मध्ये एंट्री केली होती. जवळपास अर्धा सीझन संपल्यावर राखीची शो मध्ये  एंट्री झाली होती.

राखीच्या एंट्रीनंतर शोच्या टीआरपीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. राखीने शोमध्ये खऱ्या अर्थाने रंगत आणली होती.त्यामुळे अख्खा शो राखीने एकटीने चालवला असे म्हणणं चुकीचे ठरणार नाही.

Web Title: Bigboss Impressed by Rakhi Sawant's performance gifter her this...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.