बिग बॉसची एक्स फॅट कंटेस्टेंट पहा कशी झाली फिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 16:17 IST2017-01-11T16:16:12+5:302017-01-11T16:17:57+5:30

बिग बॉस शोची एक्स कंटेस्टेंट सोनाली राऊत सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे लाइमलाइटमध्ये आहे. सोनाली तिचे काही फोटोज् नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर ...

Big Boss X Fat Contestant How To Watch Fit | बिग बॉसची एक्स फॅट कंटेस्टेंट पहा कशी झाली फिट

बिग बॉसची एक्स फॅट कंटेस्टेंट पहा कशी झाली फिट

ग बॉस शोची एक्स कंटेस्टेंट सोनाली राऊत सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे लाइमलाइटमध्ये आहे. सोनाली तिचे काही फोटोज् नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, त्यामध्ये तिचा सेक्सी अ‍ॅण्ड बोल्ड लूक आश्चर्यचकित करणारा आहे. कारण या फोटोमध्ये ती एकदम फिट दिसत असून, ती अतिशय स्टनिंग दिसत आहे. सध्या सोनाली बॉलिवूडच्या वाटेवर असून, त्यासाठीच तिने तिचा लूक बदलला असल्याचे समजते. 
बिग बॉस सीझन-८ ची कंटेस्टेंट असलेल्या सोनालीने हिमेश रेशमिया याच्या ‘द एक्सपोज’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे; मात्र बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिला बराचसा स्ट्रगल करावा लागल्याचे समजते. आपल्या लुकवर मेहनत घेताना तिने फॅट टू फिटचा प्रवास सर करताना खूप मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मेशनच्या साहाय्याने तिने तिच्या लुकला कलाटणी दिली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंवरून हे स्पष्टपणे दिसून येते. दरम्यान तिने फोटो कॅप्शनमध्ये "This is my journey from fat to fit. But in the end its all about loving yourself."  असे लिहले आहे. सोनालीने ग्रेट ग्रॅण्ड मस्ती या सिनेमातदेखील काम केले आहे. 













Web Title: Big Boss X Fat Contestant How To Watch Fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.