'बिग बॉस' मन मोकळे करण्याचे ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:21 IST2016-01-16T01:15:45+5:302016-02-13T01:21:23+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध रिअँलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सेलिब्रिटींचे कधीही न पाहिलेले रुप समोर येते. त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची संधी यामुळे ...

'Big Boss' is the place to relax | 'बिग बॉस' मन मोकळे करण्याचे ठिकाण

'बिग बॉस' मन मोकळे करण्याचे ठिकाण

व्हीवरील प्रसिद्ध रिअँलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सेलिब्रिटींचे कधीही न पाहिलेले रुप समोर येते. त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याची संधी यामुळे मिळते. यावर्षीच्या पर्वात सहभागी झालेली बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन घरात आल्यापासून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. मात्र तिचे मित्र आणि इतर कलाकार तिला धैर्याने या चॅलेंजचा सामना करण्यास सांगत आहेत. 'धूम' फेम रिमी घरामध्ये इतके दिवस शांत होती. कोणाच्याही मधात पडत नव्हती. मात्र प्रथमच तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलून मन मोकळे केले. युविका चौधरी आणि मंदना करिमीशी बोलताना रिमीने सांगितले की, ३४ वर्षांची असूनही मी अद्याप लग्नाच्या बंधनात अडकण्यास तयार नाही. लग्न जरी केले तरी बाळाला जन्म देण्याचा मी विचारही करू शकत नाही.

Web Title: 'Big Boss' is the place to relax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.