बिग बॉस : मोनाचा बॉयफ्रेंड अन् मनूमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 17:42 IST2016-12-22T17:37:54+5:302016-12-22T17:42:17+5:30
बिग बॉसच्या घरात ड्रामा झाला नाही असा दिवस आठवणे मुश्किल आहे. दररोज काहीतरी नवी क्लुप्ती काढून घरातील सदस्यांमध्ये घमासान ...

बिग बॉस : मोनाचा बॉयफ्रेंड अन् मनूमध्ये जुंपली
Tears roll down as @MonalisaAntara meets her boyfriend, but looks like all's not well between @TheManuPunjabi & her boyfriend! #BB10pic.twitter.com/0FAMHGEUaU— Bigg Boss (@BiggBoss) December 22, 2016 ">http://
}}}}Tears roll down as @MonalisaAntara meets her boyfriend, but looks like all's not well between @TheManuPunjabi & her boyfriend! #BB10pic.twitter.com/0FAMHGEUaU— Bigg Boss (@BiggBoss) December 22, 2016
गेल्या दोन आठवड्यांपासून मोनालिसाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याने मोनाबरोबरचे सर्व संबंध तोडल्याचे मनूने तिला सांगितले होते. त्यामुळे घरात ती प्रचंड अस्वस्थ होती. शिवाय मनू आणि तिच्यातील केमिस्ट्रीदेखील पहिल्यासारखी राहिली नसल्याचे बघावयास मिळत होते. त्यामुळे ती वारंवार घराबाहेर जाण्यासाठी बिग बॉसकडे विनंती करीत होती. यामुळेच घरातील काही सदस्यांनी तिला नॉमिनेटही केले आहे. तसेच ती येत्या सलमानच्या वीकेण्ड का वॉर या एपिसोडमधून कदाचित घरातून बाहेर पडू शकते अशी शंकाही वर्तविली जात आहे.
Emotions take over the Bigg Boss house after housemates are given a chance to meet their loved ones! Don't miss tomorrow's episode! #BB10— Bigg Boss (@BiggBoss) December 21, 2016 ">http://
}}}}Emotions take over the Bigg Boss house after housemates are given a chance to meet their loved ones! Don't miss tomorrow's episode! #BB10— Bigg Boss (@BiggBoss) December 21, 2016
मात्र बिग बॉसने ती घराबाहेर पडण्याअगोदरच शोमध्ये ट्विस्ट निर्माण केले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी घरात आपल्या जवळच्या नातेवाइकांना घरात पाठविण्याचा बिग बॉसने डाव खेळत घरात इमोशनल वातावरण निर्माण केले. एकीकडे आपल्या आप्तजनांच्या भेटीमुळे सुखावलेल्या सदस्यांच्या आनंदात मोनाच्या बॉयफ्रेंडने मात्र वेगळेच प्रश्न उपस्थित करीत घरातील वातावरण काहीकाळ अशांत केले.
त्याचे झाले असे की, घरातील सदस्यांचे जवळचे आप्तजन भेटत असताना मोनालिसाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याने घरात एंट्री केली. त्याला बघून हरकून गेलेल्या मोनालिसाने त्याला लगेचच मिठी मारली. अन् धुमसत रडत होती. हे बघून घरातील सर्वच सदस्य मोना आणि विक्रांतला भेटण्यासाठी गेले. तिथे मनूही उपस्थित होती. घरातील सदस्यांच्या ओळखी झाल्यानंतर त्याने मनूसमोर काही प्रश्न उपस्थित करीत त्याला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला. नॅशनल मीडियावर तू आमच्यातील संबंधाचा असा उलगडा कसा करू शकतो. तुला एखाद्या मुलीला अशाप्रकारे दोष देण्याचा काय अधिकार आहे. मोनाला तू जे काही सांगितलं त्यात कितपत सत्यता आहे. मोना नव्हे तर तूच तिच्याशी गेम खेळत आहेस अशा एकापाठोपाठ एक प्रश्नांची त्याच्यावर बरसात केली.
त्यामुळे संतापलेल्या मनूनेही त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दिलीत. त्यामुळे दोघांमध्ये काहीकाळ चांगलीच हमरीतुमरी झाली. हा सर्व प्रकार मात्र मोनालिसा उघड्या डोळ्यांनी बघत होती. कोणाच्या बाजूने बोलावे हेही तिला सूचत नव्हते. त्यामुळे येत्या काळात मनू आणि मोनालिसा यांच्यातील संबंध दुरावण्याची शक्यता आहे. जर मोनालिसा आणखी काहीकाळ घरात राहिल्यास मनू आणि तिच्यातील केमिस्ट्री बहरणार की कोमजणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
#PriyankaJagga gets to meet her kids tonight! Watch this #BB10#video to see how the kids made her day! pic.twitter.com/gNax2MjByW— Bigg Boss (@BiggBoss) December 22, 2016 ">http://
}}}}#PriyankaJagga gets to meet her kids tonight! Watch this #BB10#video to see how the kids made her day! pic.twitter.com/gNax2MjByW— Bigg Boss (@BiggBoss) December 22, 2016
प्रियंकाच्या चिमुकल्यांनी जिंकलीत घरातील सदस्यांची मनं
बिग बॉसने घरातील सदस्यांना त्यांच्या आप्तजनांना भेटण्यासाठी घरात जाण्याची संधी दिली होती. त्यामुळे गौरवचा भाऊ, मोनाचा बॉयफ्रेंड यांनी घरात हजेरी लावली. तर प्रियंका जग्गा हिची दोन चिमुकलेही घरात आली. त्यांच्यासोबत सर्वच सदस्यांनी धमाल केली. मनवीर आणि लोपामुद्रा राऊत यांनी त्यांना कडेवर घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. या मुलांनी देखील सर्वांमध्ये मिसळत त्यांच्याशी धमाल केली. काही काळ घरात एंट्री केलेल्या या चिमुकल्यांनी मात्र घरात आनंदाचे वातावरण निर्माण केले होते. आपापसातील मतभेद विसरून सर्वच सदस्य या मुलांशी गप्पा मारत होते.
#PriyankaJagga's kids greet her tonight in #BB10 as they bring a smile on everyone's face! Aren't they the cutest? pic.twitter.com/hFpX4lQ4jJ— Bigg Boss (@BiggBoss) December 22, 2016 ">http://
}}}}#PriyankaJagga's kids greet her tonight in #BB10 as they bring a smile on everyone's face! Aren't they the cutest? pic.twitter.com/hFpX4lQ4jJ— Bigg Boss (@BiggBoss) December 22, 2016