बिग बॉस : लोपामुद्राने सांगितले तिचे पर्सनल किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 03:44 PM2017-01-06T15:44:36+5:302017-01-06T15:45:09+5:30

बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉँग आउट स्पोकन कंटेस्टेंट लोपामुद्रा राऊत हिने तिच्या पर्सनल आयुष्यातील काही किस्से शेअर केले. घरातील तिचा ...

Big Boss: Lopamudraya told her personal story | बिग बॉस : लोपामुद्राने सांगितले तिचे पर्सनल किस्से

बिग बॉस : लोपामुद्राने सांगितले तिचे पर्सनल किस्से

googlenewsNext
ग बॉसच्या घरातील स्ट्रॉँग आउट स्पोकन कंटेस्टेंट लोपामुद्रा राऊत हिने तिच्या पर्सनल आयुष्यातील काही किस्से शेअर केले. घरातील तिचा सर्वांत जवळचा मित्र रोहन मेहरा याच्यासोबत चर्चा करताना तिने तिच्या कॉलेज लाइफमधील काही खासगी गोष्टींवरील पडदा दूर केला. 



मिस युनायटेड कंटेस्टेंट्स २०१६ची सेकंड रनर अप लोपामुद्राने रोहनला सांगितले की, या स्पर्धेदरम्यान मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होती. मात्र या परीक्षेत मी नापास झाली. परंतु वास्तव हे आहे की, ती त्यावेळची टॉपर आणि आउटस्टॅडिंग विद्यार्थिनी होती.  

लोपा म्हटली की, मी केवळ एका मार्क्सनी नापास झाली होती. शिक्षकांनी वैयक्तिक द्वेष मनात ठेवल्यानेच मला नापास व्हावे लागले. जेव्हा मी नापास झाली तेव्हा मला विश्वासच बसला नव्हता. मी हतबल होऊन डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र मी हार मानली नाही. पुढे ब्यूटी पेजंट आणि मिस इंडिया या स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्याचबरोबर शिक्षणही पूर्ण केले, या सर्व गोष्टी तिने रोहनशी शेअर केल्या. 



बिग बॉसच्या घरता रोहन मेहरा आणि लोपामुद्राची केमिस्ट्री चांगली होती. मात्र गौरव चोपडा घराबाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला लागले. रोहन बानी जे हिच्याशी जवळीकता साधत असल्याने लोपामुद्रा त्यांच्यावर संतापलेली आहे. जेव्हा गौरव चोपडा आणि बानी जे यांच्यातील संबंध बहरायला लागले होते, तेव्हाच रोहन आणि लोपामुद्रा जवळ आले होते. त्याचदरम्यान लोपाने रोहनशी तिच्या पर्सनल आयुष्यातील यासर्व गोष्टी शेअर केल्या होत्या. 
मात्र तिने सांगितलेल्या बºयाचशा गोष्टींमध्ये तथ्यता नसल्याने ती असे का बोलली, हे मात्र कोडेच आहे. 

Web Title: Big Boss: Lopamudraya told her personal story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.