बिग बॉस : लोकेश कुमारी परतणार बिग बॉसच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 18:27 IST2016-12-31T16:03:10+5:302016-12-31T18:27:56+5:30
बिग बॉस सिझन-१० मध्ये इंडियावाली कंटेस्टेंट म्हणून सहभागी झालेली दिल्लीची लोकेश कुमारी पुन्हा एकदा शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. घरात ...

बिग बॉस : लोकेश कुमारी परतणार बिग बॉसच्या घरात
बिग बॉस सिझन-१० मध्ये इंडियावाली कंटेस्टेंट म्हणून सहभागी झालेली दिल्लीची लोकेश कुमारी पुन्हा एकदा शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. घरात काही आठवडे राहिल्यानंतर लोकेश नॉमिनेट होऊन घराबाहेर पडली होती. आता ती पुन्हा एकदा घरात परतणार असल्याने शोमध्ये रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिल्लीची रहिवासी असलेली लोकेश तिच्यातील निरागसता आणि नटखट स्वभावासाठी ओळखली जाते. काही काळ बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर लोकेश सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात तिला यश आल्यानेच बिग बॉसने पुन्हा तिची घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#LokeshSharma, @ravikishann & @RealVinduSingh interact with housemates on #BB10NewYearKaVaar along with @bharti_lalli & @Krushna_KAS! pic.twitter.com/2Lnn6YwJsu
— Bigg Boss (@BiggBoss) December 31, 2016
घरात असताना लोकेशने सर्वच घरवाल्यांबरोबर सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. तिच्यातील निरागसतेमुळे इंडियावाल्यांबरोबरच तिची सेलिब्रिटींसोबतदेखील गट्टी जमली होती. मात्र नॉमिनेटमधून ती घराबाहेर पडली. आता ती पुन्हा घरात प्रवेश करणार असल्याने घरातील सदस्यांसाठी तिची एंट्री सुखद ठरेल की दु:खद हे बघणे मात्र औत्सुक्याचे ठरेल.
सलमान खानच्या ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमधून लोकेश घरात प्रवेश करणार आहे. न्यू ईयर सेलिब्रेशन एपिसोडमध्ये ती भोजपुरी सूपरस्टार रवि किशन, अभिनेता बिंदू दारा सिंग यांच्यासोबत घरात प्रवेश करणार आहे. मात्र घरात तिचा मुक्काम किती काळ असेल हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकले नसले तरी, लोकेश पुन्हा एकदा बिग बॉसच्या व्यासपीठावर झळकेल, हे मात्र नक्की.