बिग बॉस : सलमानला एवढ्या रागात तुम्ही कधी बघितले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 13:58 IST2016-12-10T13:49:20+5:302016-12-10T13:58:39+5:30

सलमानचा राग बहुतेकांना माहीत आहे. तो रागावल्यावर काय होवू शकते, याचीही बºयाच लोकांना जाणीव आहे. मात्र सलमानला तुम्ही एवढ्या ...

Big Boss: Have you ever seen Salman in such a rage? | बिग बॉस : सलमानला एवढ्या रागात तुम्ही कधी बघितले का?

बिग बॉस : सलमानला एवढ्या रागात तुम्ही कधी बघितले का?

मानचा राग बहुतेकांना माहीत आहे. तो रागावल्यावर काय होवू शकते, याचीही बºयाच लोकांना जाणीव आहे. मात्र सलमानला तुम्ही एवढ्या रागात कदाचित कधी बघितले नसेल. गेल्या सात वर्षांपासून ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोला होस्ट करीत असलेल्या सलमानचा पारा तेव्हा चढला जेव्हा घरातील सर्वाधिक वादग्रस्त सदस्य स्वयंघोषित बाबा स्वामी ओमने बानी जे हिच्या आईबद्दल अपशब्दांचा वापर केला. सलमानने स्वामी ओमला ऐवढे फटकारले की, त्याने स्वामी ओमला बाबा न म्हणता ‘ओम’ या एकेरी नावाने बोलत खडे बोल सुनावले.  



गेल्या सात सीजनपासून सलमान या शोला होस्ट करीत आहे. शनिवार, रविवार या दोन दिवशी प्रसिद्ध होणाºया ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमधून तो घरातील सदस्यांच्या आठवडाभराच्या हालचालींचा आढावा घेत असतो. त्यामुळे घरातील सदस्यांवरदेखील सलमानच्या एपिसोडचे दडपण असते. कधी संतापून, तर कधी विनोदी शैलीत तो घरातील सदस्यांची फिरकी घेत असतो. मात्र गेल्या सात सीजनमध्ये तो पहिल्यांदाच स्वामी ओमवर एवढा संतापून गेला की, काहीकाळ स्वामी ओमची बोलती बंद झाली. 



त्याचे झाले असे की, कॅप्टनशिपसाठी प्रियंका जग्गा आणि गौरव चोपडा यांच्यात एक टास्क घेण्यात आला होता. या टास्कदरम्यान प्रियंका जग्गाच्या टीममध्ये असलेल्या स्वामी ओम याने बानीला ‘...तर तुझी आई मरणार’ असे अपशब्द वापरले होते. त्यावरून संतापलेल्या बानीने स्वामी ओमला धक्का देत चांगलेच सुनावले. यावरून घरातील सर्वच सदस्यांमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बानीने तर ‘मला आताच घराबाहेर काढा, मला हा गेम खेळायचा नाही’ असे म्हणत घराच्या मुख्य दरवाजाची तोडफोडही केली.
 


त्यामुळे ‘वीकेण्ड का वॉर’मध्ये स्वामी ओम हे सलमानच्या निशाणावर हमखास असतील हे जवळपास निश्चित होते. मनवीरने तर तशी कल्पनाही स्वामी ओमला दिली होती अन् अगदी तसेच घडले. सलमानने स्वामी ओमला तू बानीच्या आईबद्दल असे अपशब्द कसे बोलू शकतोस, असा जाब विचारला. तसेच टास्कदरम्यान तू किचनमध्ये टॉयलेट केले, तुला घरात मुली आहेत याची जाणीव नव्हती का? असे एकापाठोपाठ एक प्रश्न विचारून स्वामीला धारेवर धरले. तसेच तू ‘बाबा’ म्हणण्याच्या लायकीचा नाहीस, अशा शब्दात सलमानने स्वामी ओमला फटकारले. 



सलमानचा राग बघून काहीकाळ घरातील सदस्यही स्तब्ध झाले होते. स्वामी ओमची तर बोलतीच बंद झाली होती. आतापर्यंतच्या सात सीजनमध्ये सलमान पहिल्यांदाच ऐवढा संतापल्यामुळे शोच्या निर्मात्यांचीही चिंता वाढली असेल, असे म्हटल्यास काहीच वावगे ठरू नये.  



बानीलाही दिल्या ‘अ‍ॅँगर मॅनेजमेंट’ टिप्स
स्वामी ओमने बानीच्या आईबद्दल काढलेल्या अपशब्दांमुळे संतापलेल्या बानीने स्वामी ओमला धक्का देत सुनावले होते. दोघांमध्ये चांगलीच तू तू मै मै झाली होती. बानीचा राग एवढा होता की, तिने घरातील मुख्य दरवाजाची तोडफोड केली. यामुळे सलमानने तिला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ‘अ‍ॅँगर मॅनेजमेंट’ टिप्स दिल्या.  
यावेळी सलमानने बानीला सांगितले की, मी जेव्हा लहान होतो तेव्हा मलाही असाच राग येत होता. नंतरच्या काळात मी रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो. त्यामुळे तुला जर राग आला तर तू कोणालाही शिव्या किंवा धक्का देऊ नकोस. त्यामुळे तुझीच नव्हे तर तुझ्या परिवाराचीही इमेज खराब होईल. 



गौरवही संतापला
बानीच्या आईबद्दल स्वामी ओमच्या अपशब्दामुळे गौरवचाही प्रचंड संताप झाला. आतापर्यंतच्या शोमध्ये कधी नव्हे ते पहिल्यांदाच त्याने बानीचे भक्कमपणे बाजू घेतली. त्याचा संताप एवढा होता की, त्याने घरातील खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच तो रात्री उशिरापर्यंत तिच्याजवळ बसून तिची समजूत काढत होता. स्वामी ओमला आपण मिळून धडा शिकवू, असे म्हणून तिला अश्वस्तही करीत होता. 

Web Title: Big Boss: Have you ever seen Salman in such a rage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.