बिग बॉस : विजेता घोषित करा अन्यथा... स्वामी ओमची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 17:27 IST2017-01-06T17:27:14+5:302017-01-06T17:27:14+5:30

​आतापर्यंत घरातील कंटेस्टेंट्सला धमकी देणाºया स्वयंघोषित बाबा स्वामी ओमची बिग बॉसला धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. ‘मला घोषित करा अन्यथा माझे समर्थक गप्प बसणार नाहीत’ अशी धमकी देत त्याने थेट बिग बॉसलाच आव्हान दिले आहे.

Big Boss: Declare the winner otherwise ... Swami Omchi threat | बिग बॉस : विजेता घोषित करा अन्यथा... स्वामी ओमची धमकी

बिग बॉस : विजेता घोषित करा अन्यथा... स्वामी ओमची धमकी

ापर्यंत घरातील कंटेस्टेंट्सला धमकी देणाºया स्वयंघोषित बाबा स्वामी ओमची बिग बॉसला धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. ‘मला घोषित करा अन्यथा माझे समर्थक गप्प बसणार नाहीत’ अशी धमकी देत त्याने थेट बिग बॉसलाच आव्हान दिले आहे. 

.@bani_j & @rohan4747 lose their cool after #OmSwami's cheap actions infuriate them! #BB10pic.twitter.com/rYgFC5Uw4i— Bigg Boss (@BiggBoss) January 5, 2017 ">http://

}}}}
कॅप्टेन्सी टास्कदरम्यान रोहन मेहरा आणि बानी जे यांच्या चेहºयांवर लघवी फेकणाºया स्वामी ओमची घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे; मात्र बाहेर आल्यानंतरही त्यांच्यातील विक्षिप्त माणूस शांत बसायला तयार नाही. आता तर त्यांनी थेट बिग बॉसशी पंगा घेतला आहे. ‘माझी पोहोच तुम्हाला कदाचित माहीत नाही. कोट्यवधींच्या संख्येने माझे समर्थक असल्याने ते शांत बसणार नाहीत. त्यामुळे मला या शोचा विजेता घोषित करा... न केल्यास गंभीर परिणाम भोगायला तयार रहा’ अशा शब्दात त्याने बिग बॉसला धमकावले आहे. 

Housemates lock #OmSwami in the jail after he gets out of control! #BB10pic.twitter.com/ELopgt8Xbj— Bigg Boss (@BiggBoss) January 5, 2017 ">http://

}}}}
बिग बॉस सीझन-१० चा सर्वाधिक वादग्रस्त कंटेस्टेंट म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. घरातील असा एकही कंटेस्टेंट्स नाही, ज्याला स्वामी ओमने सतावले नसेल. जोरात बोलून किंवा खोटं बोलून तो घरातील इतरांना धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत असे. खोटं बोलण्यात तर त्याचा हातखंडाच असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळाले. दिल्लीत सुरू असलेल्या एका खटल्यासाठी जेव्हा त्याला घरातून बाहेर काढण्यात आले होते, तेव्हा त्याने स्वत:च फुलांच्या काही माळा खरेदी करून घरात प्रवेश केला होता. तसेच या माळांनी माझ्या चाहत्यांनी स्वागत केल्याचे त्याने घरतील इतर कंटेस्टेंट्सना सांगितले होते. 

.@bani_j & @rohan4747 get furious on seeing that there is no end to #OmSwami's unapologetic actions! #BB10pic.twitter.com/6GVrf2blc3— Bigg Boss (@BiggBoss) January 5, 2017 ">http://

}}}}
हा पहिलाच प्रसंग नव्हता, यापूर्वीदेखील त्याने वेळोवेळी खोटं बोलून इतरांना हैराण करून सोडले होते. सध्या स्वामी ओम घराबाहेर असून, आता बिग बॉसशी पंगा घेण्यास त्याने सुरुवात केली आहे. बिग बॉसवर आरोपांची बरसात करीत असतानाच मीच विनर असल्याचाही तो वारंवार उल्लेख करीत आहे. त्याचबरोबर मी घरातील विनर असताना केवळ मी सर्वसामान्य असल्याने मला डावलले जात असल्याचेही तो म्हणत आहे; मात्र माझे समर्थक याचा बदला घेतील अशाही धमक्या स्वामी ओम बिग बॉसला देत आहे. 

This Jumme ki raat, watch #BB10WeekendKaVaar@beingsalmankhan ke saath! Tune in at 10:30PM. #videopic.twitter.com/o2bBd9a6xg— Bigg Boss (@BiggBoss) January 6, 2017 ">http://

}}}}
स्वामी ओमचे कारनामे बघून या शोचा होस्ट सलमान खान प्रचंड संतापलेला असून, त्यानेही स्वामी ओमपासून चार हात लांब राहण्याचाच निर्णय घेतला आहे. आता पुढील काळात स्वामी ओम आणखी काय कारनामा करणार याची धडकी बिग बॉसच्या मनात बसली नसेल तरच नवल.

Web Title: Big Boss: Declare the winner otherwise ... Swami Omchi threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.