बिग बॉस : कॅप्टनशिपसाठी बानी, लोपा अन् मनवीर भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 18:02 IST2016-12-15T17:19:18+5:302016-12-15T18:02:31+5:30

बिग बॉसच्या घरात कॅप्टनशिप अन् वाद हे सूत्र ठरलेले आहे. कारण कॅप्टनशिपचे फायदे घरातील सदस्य उत्तम प्रकारे जाणून असल्याने ...

Big Boss: Bani, Lopa and Manavir for captcha | बिग बॉस : कॅप्टनशिपसाठी बानी, लोपा अन् मनवीर भिडले

बिग बॉस : कॅप्टनशिपसाठी बानी, लोपा अन् मनवीर भिडले

ग बॉसच्या घरात कॅप्टनशिप अन् वाद हे सूत्र ठरलेले आहे. कारण कॅप्टनशिपचे फायदे घरातील सदस्य उत्तम प्रकारे जाणून असल्याने त्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी असते. आतापर्यंतच्या कॅप्टनशिपवरून झालेला वाद प्रेक्षकांनी बघितलाच, आता पुन्हा मनवीर, लोपा आणि बानी कॅप्टनशिपसाठी भिडले आहेत. 

#ManveerGurjar, @lopa9999 & @bani_j tangle themselves in the captaincy task! More in #BB10#video! https://t.co/k4qIOb7nXg— Bigg Boss (@BiggBoss) December 15, 2016}}}} ">http://


या आठवड्यासाठी बिग बॉसने कॅप्टनशिपसाठी एक आगळा-वेगळा टास्क दिला आहे. ज्यानुसार एक तांब्याची प्लेट तिघांनाही हातात पकडून ठेवायची आहे. जो सदस्य अखेरपर्यंत ही प्लेट पकडून ठेवेल त्याच्याच गळ्यात कॅप्टनशिपची माळ पडणार आहे. या टास्कमध्ये बानी, लोपा आणि मनवीरमध्ये जबरदस्त फाइट बघावयास मिळणार आहे. घरातून सुरू होणारा हा टास्क अखेर अ‍ॅक्टिव्हीटी एरियामध्ये येऊन पोहोचतो. तिघांकडूनही कॅप्टनशिपसाठी दावेदारी केली जात असल्याने टास्कदरम्यान त्यांच्यात चांगलीच बाचाबाची होते. 



तिघीही प्लेट पकडून ठेवण्याच्या नादात स्विमिंग पूलमध्ये पडतात. त्यात प्रियंका जग्गा तिघांच्या भांडणात उडी घेत असल्याने प्रियंका अन् लोपामध्ये चांगलीच हमरी-तुमरी होते. प्रियंका तिघांच्या चेहºयावर पाणी फेकत असते, त्यामुळे भडकलेली लोपा प्रियंकाची चांगलीच कानउघडणी करते. मात्र हा टास्क कोण जिंकणार ही बाब मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. 

Web Title: Big Boss: Bani, Lopa and Manavir for captcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.