बिग बींचा केसीबी घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:34 IST2017-10-14T06:03:50+5:302017-10-14T11:34:21+5:30

ऑगस्ट महिन्यांपासून बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले. ‘कौन बनेगा करोडपती ९’ शोचे ...

Big BICA will soon send audiences to KCB? | बिग बींचा केसीबी घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप ?

बिग बींचा केसीबी घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप ?

स्ट महिन्यांपासून बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले. ‘कौन बनेगा करोडपती ९’ शोचे सूचसंचालन ते करतायेत. या शोला प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती लाभली आहे. केबीसीच्या यंदाच्या सिझनमध्ये काही नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले. याचाही फायदा शोला चांगलाच झाला. सर्वसामान्य स्पर्धकांसोबत दर आठवड्याला रिअल लाइफ हिरो शोमध्ये सहभागी व्हायचे. चार्ट शो च्या लिस्टमध्ये हा शो अग्रस्थानी आहे. सलमान खानच्या बिग बॉसला आणि अक्षय कुमारच्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या रिअॅलिटी शोला त्यांनी मागे टाकले आहे. आतापर्यंत भारतीय महिला क्रिकेट संघाचे खेळाडू हरमनप्रीत कौर, मिताली राज आणि स्मृती मंधाना यांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच पी.व्ही.सिंधू, ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनासुद्धा शोमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. मात्र आता बिग बींच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक वाईट बातमी आहे. 'केबीसी ९' हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळते आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार केबीसीचा शेवटचा भाग 23 ऑक्टोबरला टेलिकास्ट होणार आहे. 

ALSO READ :  छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चनच 'शहेनशाह'

23 ऑक्टोबरनंतर सोनी टीव्हीवरील रात्री 9 ते 10.30 चा स्लॉट नव्या मालिकांना देण्यात आला आहे. स्पॉटब्वॉय डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार विवादीत शो पहरेदार पिया की चा नवा सीक्वल, जायद खान चा शो हासिल आणि एक दिवाना था हा मालिका केबीसीच्या जागी टेलिकास्ट करण्यात येणार आहेत. 

'पहेरदार पिया की'चा सीक्वल 'रिश्ते लिखेंगे हम नए'ला रात्री 9 चा स्लॉट देण्यात आला आहे. या मालिकेत तेजस्वी आणि रोहित संचित परतणार आहेत.  या मालिकेची शूटिंग बिकानेरमध्ये सुरु करण्यात आली आहे. या मालिकेला प्राईम टाईमचा स्लॉट देण्यात आला आहे.  जायद खान 'हासिल' मालिकेतून डेब्यू करतो आहे. ही मालिका 9.30 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 10 वाजता एक दिवाना था टेलिकास्ट होणार आहे.  त्यामुळे केसीबी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.    

Web Title: Big BICA will soon send audiences to KCB?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.