कॉमेडी हायस्कूलच्या कलाकारांमध्ये भारती सिंगची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 11:35 IST2018-03-22T06:05:25+5:302018-03-22T11:35:25+5:30

कॉमेडी क्वीन भारती सिंग आता डिस्कव्हरी जीतवरील लोकप्रिय शो 'कॉमेडी हायस्कूल'मध्ये झळकणार आहे.खरंतर लग्नानंतर थोडा वेळ तिने तिच्या फॅमिलीला ...

Bharti Singh's entry to cast comedy high school entry | कॉमेडी हायस्कूलच्या कलाकारांमध्ये भारती सिंगची होणार एंट्री

कॉमेडी हायस्कूलच्या कलाकारांमध्ये भारती सिंगची होणार एंट्री

मेडी क्वीन भारती सिंग आता डिस्कव्हरी जीतवरील लोकप्रिय शो 'कॉमेडी हायस्कूल'मध्ये झळकणार आहे.खरंतर लग्नानंतर थोडा वेळ तिने तिच्या फॅमिलीला दिला होता. काही महिने निवांत वेळ घालवल्यानंतर आता भारती सिंग पुन्हा रसिकांना खळखळुन हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. एक वेगळ्याच कॉमेडी धंगात भारती यात रसिकांसमोर येणार आहे.शोमध्ये जुनागढच्या राजकुमारीची भू़मिका साकारणार असून ती इथे शाळेला निधी देण्यासाठी आली आहे.ह्या शोमध्ये राम कपूरसोबतही ती रोमँटीक कॉमेडी करताना दिसणार आहे.आपल्या अचूक विनोदी टायमिंग,रॅपिंग आणि डान्सिंग कौशल्यासह ही स्टॅन्डअप कॉमेडियन प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणार यांत काही शंकाच नाही.कॉमेडी हायस्कूलमध्ये काम करण्याबद्दल भारती म्हणाली,“कोणत्याही प्रकारची कॉमेडी असो ते सादर करण्यात मला एक वेगळीच मजा येत. एक वेगळाच उत्साह निर्माण होतो.त्यामुळे कॉमेडी हायस्कूलची खास संकल्पनाही मला आवडली आणि मिळालेली संधी मी स्विकारली.कॉमेडी हायस्कूल म्हणजे टेलिव्हिजनवरील हास्यकल्लोळ आहे.राम कपूर,परितोष त्रिपाठी, गोपाल दत्त आणि ह्या शोमधील अन्य सर्वच कलाकारांसोबत काम करताना मला खूप धम्माल आली.मला खात्री आहे की रसिकांना या शो चे आगामी एपिसोड्‌स आणि माझे काम आवडेल.कॉमेडी हायस्कूल हा क्लासरूमच्या सेटअपमधून समाज,संस्कृती,शिक्षण आणि सध्याच्या घडामोडींवरील एक हलकाफुलका कटाक्ष टाकतो.ऑनस्क्रीन भरणा-या या शाळेमध्ये इंग्रजी, हिंदी, शारीरिक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास अशा अनेक विषयांचे शिक्षक, एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक आणि नैतिक व सच्चे ट्रस्टीही आहेत.प्रत्येक आठवड्‌याला अग्रगण्य सेलेब्रिटी वेगवेगळ्‌या अवतारात ह्या शाळेला भेट देतील.ह्या शोमध्ये राम कपूर, गोपाल दत्त,परितोष त्रिपाठी, कृष्णा भट्ट, जसमीत भाटिया आणि दीपक दत्ता अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आपल्याला हसून हसून लोटपोट करणार हे मात्र नक्की.



cnxoldfiles/a>स्टॅण्ड-अप विनोदवीर राजीव निगम चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याच्या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.या मालिकेद्वारे प्रेक्षकांना प्रथमच सद्य राजकीय स्थितीवर उपहासात्मक भाष्य केलेले पाहायला मिळेल.चैतूलाल हा मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेला असून या सत्तालालसेबद्दल त्याला अजिबात अपराधी वाटत नाही.आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,विनोदी अभिनेत्री भारती सिंह ही या मालिकेत एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: Bharti Singh's entry to cast comedy high school entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.