भरत जाधवच्या 'या' मालिकेने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा, सेटवर असं केलं खास सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 02:10 PM2021-02-16T14:10:39+5:302021-02-16T14:55:46+5:30

Sukhi mansacha sadara serial completed 100 episode : केदार शिंदे निर्मित आणि दिग्दर्शित या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली.

Bharat jadhav serial sukhi mansacha sadara complete 100 episode | भरत जाधवच्या 'या' मालिकेने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा, सेटवर असं केलं खास सेलिब्रेशन

भरत जाधवच्या 'या' मालिकेने पूर्ण केला 100 भागांचा टप्पा, सेटवर असं केलं खास सेलिब्रेशन

googlenewsNext

‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ लहानपण विचारात नाही तर आचरणात असावं लागतं. आपली कुवत ओळखून ती स्वीकारता आली की मग जगण्यातील सहजता वाढते आणि आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. साखरेच्या एका दाण्यावर मुंगी खुश असते, म्हणजेच अल्पसंतुष्टी हे जीवनातील आनंदाचं गमक आहे हे ती सांगून जाते. आपण नेहेमीच ऐकतो सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकालाच हवा असतो पण तो दुर्मिळ नाही, प्रत्येक माणूस तो त्याच्याकडे असलेल्या धाग्यांमधून विणू शकतो. आणि हेच गमक आचारणात आणून आपलं आयुष्य जगणारे चिमणराव आणि त्यांचं सुखी कुटुंब दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलं.

 केदार शिंदे निर्मित आणि दिग्दर्शित या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. केदार शिंदे यांनी या मालिकेद्वारे छोट्या पड्यावर पुनरागमन केले तसेच महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव यांना मालिकेद्वारे रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याचसोबत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, श्रुजा प्रभुदेसाई, मालिकेतील मोरू मैना यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली. बघता बघता मालिकेने १०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही.


 

Web Title: Bharat jadhav serial sukhi mansacha sadara complete 100 episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.