मालिकेच्या सेटवर भानू उदय झाला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 15:19 IST2017-10-31T09:49:48+5:302017-10-31T15:19:48+5:30

प्रेक्षकांना मालिकेतील अभिनेत्यांचा अभिनय पाहताना ही किती सहजसाध्य कला आहे, असे वाटते, त्यांना हे ठाऊक नसते की त्यासाठी या ...

Bhanu got injured on the set of the series | मालिकेच्या सेटवर भानू उदय झाला जखमी

मालिकेच्या सेटवर भानू उदय झाला जखमी

रेक्षकांना मालिकेतील अभिनेत्यांचा अभिनय पाहताना ही किती सहजसाध्य कला आहे, असे वाटते, त्यांना हे ठाऊक नसते की त्यासाठी या कलाकारांनी किती प्रदीर्घ आणि कष्टदायक मेहनत घेतलेली असते.‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत विजय नामधारीची भूमिका साकारणारा अभिनेता भानू उदय हा त्याच्या अभिनयकौशल्याला प्रेक्षकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे खुश आहे. त्याला अनेकांकडून अभिनंदनाचे संदेश येऊ लागल्यावर भानू चकितच झाला.प्रत्येक यशापूर्वी संबंधित व्यक्तीला बराच त्रास आणि दु:ख सहन करावे लागते, असे म्हटले जाते. त्या उक्तीनुसार या मालिकेसाठी आधी वजन भरपूर वाढविणे आणि नंतर ते सर्व कमी करावे लागणे या दिव्यातून भानूला जावे लागले. इतकेच नव्हे, तर सेटवरील काही खात्रीलायक सूत्रांनी आम्हाला सांगितले की भानूबरोबर भावनाप्रधान किंवा मारामारीचा प्रसंग साकारण्यास इतर कलाकार घाबरतात. कारण प्रसंग साकारताना भानूला भान राहात नाही आणि तो प्रत्यक्षात तसे वागायला लागतो.अर्थात प्रसंग कोणताही असो- भावनाप्रधान, रागावलेला किंवा दुसरा कोणताही प्रसंग असला, तरी विजय नामधारीच्या भूमिकेत शिरल्यावर भानू उदय ती भूमिका जिवंत अनुभवतो. पूर्वी एका हाणामारीच्या प्रसंगात त्याला झालेल्या जखमांचे व्रण आजही त्याच्या शरीरावर आहेत. भावनाप्रधान प्रसंगात अश्रू ढाळण्यासाठी त्याला ग्लसरिनची गरज भासत नाही, इतका तो परिपूर्ण आहे.यासंदर्भात भानू उदय म्हणाला, “विजय नामधारीची भूमिका साकारताना माझं काम हे आहे की प्रेक्षकांना विजय नामधारी हा अस्सल वाटला पाहिजे. कोणीतरी काहीतरी काल्पनिक प्रसंग रंगवितो आहे, असं त्यांना वाटता कामा नये. मालिकेतील व्यक्तिरेखा ज्या वेदनेचा अनुभव घेत असते, ती वेदना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. ते साध्य करताना कधी कधी मी टोकाला जातो, हे खरं आहे. पण मला माझं काम इतकं आवडतं की कोणताही प्रसंग मी नैसर्गिकपणे अनुभवत असल्याप्रमाणे साकार करतो.”

भानूला मालिकेतील मिळालेलीभूमिका मनापासून आवडल्याने त्याने खूप मेहनत घेतली आहे.भानूला 25 वर्षांच्या तरुणाची भूमिका साकारण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्याला हे वाढलेले वजन कमी करणे भाग होते. पण भानूने नियमित व्यायाम आणि आहारावरील कठोर निर्बंधांद्वारे आपले वाढलेले वजन घटवून आपली अंगयष्टी एखाद्या 25 वर्षीय तरुणाइतकी सडपातळ केली. आपल्या या वजन वाढविणे-घटविण्याच्या प्रयोगाबाबत भानू उदय म्हणाला, “व्यक्तिरेखेसाठी प्रयोग करण्याची माझी नेहमीच तयारी असते आणि ती व्यक्तिरेखा वास्तव दिसावी, असा माझा प्रयत्न असतो. ही मालिका मला अत्यंत प्रिय असून त्यातील भूमिकेसाठी मी कितीही टोकाला जाऊ शकतो. विजय नामधारी या व्यक्तिरेखेसाठी माझा सडपातळ-स्थूल ते पुन्हा सडपातळ होण्याचा प्रवास माझ्या नेहमीच लक्षात राहील. प्रेक्षकांना ही मालिका आणि माझी व्यक्तिरेखा जोवर आवडत आहे, तोपर्यंत माझ्या सा-या मेहनतीचं चीज झालं, असं मी मानतो.”

Web Title: Bhanu got injured on the set of the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.