भाबीजी शिल्पा शिंदेच्या जाचाला कंटाळून विकास गुप्ताने पुन्हा एकदा घरातून काढला पळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 17:31 IST2017-11-03T12:00:46+5:302017-11-03T17:31:59+5:30
शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यातील वाद चांगलाच रंगला असून, पुन्हा एकदा विकासने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे.
.jpg)
भाबीजी शिल्पा शिंदेच्या जाचाला कंटाळून विकास गुप्ताने पुन्हा एकदा घरातून काढला पळ !
ब ग बॉसच्या सीजन ११ मध्ये एकापेक्षा एक असे स्पर्धक आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण पहिल्या दिवसापासूनच या स्पर्धकांनी घरात अक्षरश: रान पेटविले आहे. त्यातही शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यातील वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितले की, अर्शी, महजबीन आणि विकास गुप्ता यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली. मात्र जेलमध्ये गेलेल्या विकास गुप्ताचा शिल्पा शिंदेने एवढा छळ केला की, त्याने पुन्हा एकदा घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचे झाले असे की, जेलमध्ये विकास झोपण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु शिल्पा त्याला असा काही त्रास देते की, त्याचे जेलमध्ये जगणे मुश्कील होते. कॉमेण्ट, टोमणे मारताना शिल्पा अक्षरश: सर्व मर्यादा ओलांडताना दिसते.
बिग बॉसने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये बघावयास मिळाले की, विकास जेलमध्ये झोपण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु शिल्पा आणि आकाश ददलानी जेलबाहेर प्रचंड तमाशा करतात. त्याला त्रास देण्याची हे दोघे एकही संधी सोडत नाहीत. शिल्पा विकासवर प्रत्येक स्वरूपाच्या कॉमेण्ट करते. मात्र जेव्हा विकास या दोघांकडे पाठ फिरवून झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शिल्पा त्याला पाण्याची बाटली फेकून मारते. शिल्पाच्या या जाचाला कंटाळून विकास टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने जेलबाहेर निघतो. पुढे तो टॉयलेटमध्ये न जाता घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर पुन्हा जेलमध्ये जाण्यासही नकार देतो.
त्यानंतर विकास असा काही गोंधळ घालतो, की संपूर्ण घरातील सदस्य चकित होतात. त्यानंतर सर्वजण त्याची समजूत काढण्याचाही प्रयत्न करतात. मात्र तो कोणाचेही ऐकत नाही. अखेर बिग बॉस विकासची समजूत काढून त्याला शांत करतात. या अगोदरदेखील विकासने शिल्पाच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

}}}} ">Shilpa Shinde is still not done testing @lostboy54's patience! What will happen next? Find out tonight at 10:30pm! #BB11#BBSneakPeekpic.twitter.com/rBqHSGzg46— COLORS (@ColorsTV) November 3, 2017
Shilpa Shinde is still not done testing @lostboy54's patience! What will happen next? Find out tonight at 10:30pm! #BB11#BBSneakPeekpic.twitter.com/rBqHSGzg46— COLORS (@ColorsTV) November 3, 2017