क्योंकी साँस भी कभी बहू थी फेम तस्नीम शेख नऊ वर्षांनंतर परतली छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:29 IST2017-01-06T16:29:13+5:302017-01-06T16:29:13+5:30
क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतील मोहिनी या भूमिकेमुळे तस्नीम शेखला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेप्रमाणेच ...

क्योंकी साँस भी कभी बहू थी फेम तस्नीम शेख नऊ वर्षांनंतर परतली छोट्या पडद्यावर
क योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतील मोहिनी या भूमिकेमुळे तस्नीम शेखला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेप्रमाणेच तिने कुमकुम, कुसुम यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अनेक मालिकांमध्ये काम करूनही तस्नीम गेल्या कित्येक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. तस्नीम लग्न झाल्यानंतर लग्न आणि मुलीमध्ये रमली. त्यामुळे तिने अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले.
पण आता नऊ वर्षांनंतर ती छोट्या पडद्यावर परतणार आहे. एक विवाह ऐसा भी या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तस्नीम तिच्या पुनरागमनाविषयी सांगते, "मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे मी अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी मला गेल्या अनेक वर्षांपासून मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. पण मालिकेत काम करायचेच नाही असे मी ठरवले होते. मला माझ्या मुलीकडे लक्ष द्यायचे असल्याने मी मालिकेत काम करण्यासाठी नकार देत होती. पण आता माझी मुलगी सात वर्षांची झाली आहे. तिला आता माझ्या व्यवसायाविषयी कळायला लागले आहे. त्यामुळे आता मी अभिनयाकडे पुन्हा वळण्याचे ठरवले आहे. एक विवाह ऐसा भी या मालिकेची संकल्पना ही सध्याच्या मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. त्यामुळे एका चांगल्या मालिकेद्वारे मी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे याचा मला आनंद होत आहे. प्रेक्षकांनी पूर्वी ज्याप्रमाणे माझ्या भूमिकांवर प्रेम केले तसेच प्रेम त्यांनी मला पुन्हा द्यावे असे मी त्यांना आवर्जून सांगेन."