​कपिल शर्माच्या कार्यक्रमात झळकणार बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 11:24 IST2017-01-11T11:24:29+5:302017-01-11T11:24:29+5:30

द कपिल शर्मा शो हा आज छोट्या पडद्यावरचा सगळ्यात प्रसिद्ध रिअॅलिटी शो मानला जातो. टीआरपीच्या रेसमध्येदेखील हा कार्यक्रम नेहमीच ...

Baba Ramdev will be seen in Kapil Sharma's program | ​कपिल शर्माच्या कार्यक्रमात झळकणार बाबा रामदेव

​कपिल शर्माच्या कार्यक्रमात झळकणार बाबा रामदेव

कपिल शर्मा शो हा आज छोट्या पडद्यावरचा सगळ्यात प्रसिद्ध रिअॅलिटी शो मानला जातो. टीआरपीच्या रेसमध्येदेखील हा कार्यक्रम नेहमीच अव्वल असतो. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास हजेरी लावत असतात. बॉलिवुडची मंडळी तर आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी खास याच कार्यक्रमाची निवड करतात. या कार्यक्रमातील कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, अली असगर आणि नवज्योतसिंग सिद्धू हे तर या कार्यक्रमामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. 
द कपिल शर्मा शोमध्ये झळकण्याची संधी मिळावी अशी अनेक सेलिब्रेटींची इच्छा असते. कपिल शर्माच्या कार्यक्रमात येऊन आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण योगगुरू बाबा रामदेव कधीच कपिलच्या कार्यक्रमात झळकले नाहीत. त्यांनी या कार्यक्रमाचा भाग व्हावे असे नेहमीच या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना वाटत होते. बाबा रामदेव यांनी एका भागात तरी झळकावे यासाठी निर्मात्यांनी अनेकवेळा त्यांना विचारलेदेखील होते. पण प्रत्येक वेळी काही ना काही तरी कारण देऊन त्यांनी कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. पण लवकरच ते कपिल शर्मा या शोमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. बाबा रामदेव यांनी अखेरीस या कार्यक्रमास होकार दिला असून ते लवकरच कपिलच्या टीमसोबत चित्रीकरण करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण बाबा रामदेव अथवा कपिलच्या टीमकडून कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 
बाबा रामदेव हे द कपिल शर्मा शोमध्ये आल्यावर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार यात काही शंकाच नाही. यामुळे त्यांच्या येण्याने कार्यक्रमाच्या टीआरपीत आणखी भर पडेल अशी सगळ्यांना आशा आहे. 


Web Title: Baba Ramdev will be seen in Kapil Sharma's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.