आएशा सिंह पडली लेहेंग्याच्या प्रेमात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 15:13 IST2018-04-12T09:43:31+5:302018-04-12T15:13:31+5:30

‘झी टीव्ही’वरील ‘इश्क सुभान अल्ला’ या नव्या मालिकेत तिहेरी तोंडी तलाक या समस्येला हात घालण्यात आला असून एका तरुण ...

Ayesha Singh falls in love with Lehnga! | आएशा सिंह पडली लेहेंग्याच्या प्रेमात !

आएशा सिंह पडली लेहेंग्याच्या प्रेमात !

ी टीव्ही’वरील ‘इश्क सुभान अल्ला’ या नव्या मालिकेत तिहेरी तोंडी तलाक या समस्येला हात घालण्यात आला असून एका तरुण मुस्लिम जोडप्याला या समस्येला कसे तोंड द्यावे लागते, याचे चित्रण झारा (आएशा सिंह) आणि कबीर (अदनान खान) यांच्या वादळी प्रेमकथेतून दाखविण्यात आले आहे. या मालिकेच्या प्रारंभीच्या भागांना लाभलेल्या प्रचंड प्रेक्षकसंख्येने ही मालिका 2017-18 मधील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेल्या मालिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. आता या मालिकेचे कथानक अशा वळणावर आले आहे की ज्यामुळे स्वतंत्र आणि उदार विचारसरणीच्या झाराला पारंपरिक विचारसरणीच्या कबीर या धर्मगुरूबरोबर निका लावावा लागतो.

या भव्य विवाहसोहळ्यासाठी सर्वच व्यक्तिरेखांनी सुंदर पोशाख परिधान केले असले, तरी आपल्या नववधूच्या खास पोशाखातील नायिका आएशा सिंहचे मादक सौंदर्य खुलून दिसत होते. या सौंदर्यवती अभिनेत्रीने गडद लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि त्याला शोभेसा आणि भरपूर भरतकाम केलेला दुपट्टा घेतल्याने हा पोशाख अतिशय श्रीमंती थाटाचा दिसत होता. हा पोशाख मुद्दाम तयार करणारी डिझायनर मी व्होराने या लेहेंग्यासाठी कशा प्रकारे तयार करावे लागले, त्याचा अनुभव कथन केला.

आपल्या या डिझानयर लेहेंग्याबद्दल अमी व्होरा म्हणाली, “मालिकेतील निकाच्या प्रसगासाठी सर्वच कलाकारांना नवे कपडे देण्यात आले होते, पण आएशा ही वधू असल्याने तिचा लेहेंगा इतरांच्या कपड्यांमध्ये उठून दिसणं गरजेचं होतं. मी आणि माझ्या टीमने या लेहेंग्यासाठी कोणतं कापड वापरायचं आणि त्यावर कोणती नक्षी सेल, त्याचं संशोधन करण्यात एक महिना व्यतीत केला. यावरील डिझाईनसाठी आम्ही अली झीशान, नोमी अन्सारी आणि टीना दुर्राणी यासारख्या नामवंत पाकिस्तानी डिझायनर्सच्या कपड्यांचंही परीक्षण केलं. आएशाचा लेहेंगा तयार करण्यासाठी तब्बल सहा कारागीर 15 दिवस 24 तास काम करीत होते. या लेहेंग्यासाठी आम्ही काही तुर्की डिझायनरच्या कामाचाही अभ्यास केला आणि त्यावरील भरजरी भरतकामासाठी मखमली कापडाचाही वापर केला. यामुळे हा लेहेंगा अतिशय उंची आणि श्रीमंती थाटाचा दिसतो.”

आपल्या लेहेंग्याबद्दल आएशा म्हणाली, “ज्या अभिनेत्रीसाठी कपडे तयार करायचे, त्या अभिनेत्रीला कोणता कपडा खुलून दिसेल याचं अमीला अचूक ज्ञान आहे. त्यामुळे ती त्या अभिनेत्रीला शोभेसेच कपडे तयार करते. अमीने माझ्यासाठी जो लेहेंगा तयार केला होता, तो पाहून मी थक्क झाले आणि त्याचं कापड आणि त्यावरील भरतकाम आणि नक्षीकाम पाहताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडले. तिला माझी आवड आणि अभिरुची चांगलीच ठाऊक होती त्यामुळे तिने हा लेहेंगा त्यानुसार तयार केला. आता हा अतिशय श्रीमंती लेहेंगा मला कधी नेसायला मिळतो, याची मी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.”

Web Title: Ayesha Singh falls in love with Lehnga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.