‘नामकरण’मध्ये अवनीचा मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:28 IST2018-02-15T05:58:31+5:302018-02-15T11:28:31+5:30
स्टार प्लसवरील नामकरण ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नामकरण मध्ये या रोमँटिक मालिकेतील नीला या ...
‘नामकरण’मध्ये अवनीचा मृत्यू?
स टार प्लसवरील नामकरण ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नामकरण मध्ये या रोमँटिक मालिकेतील नीला या व्यक्तिरेखेचा अकस्मात अंत दाखविल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला होता. नीलाची भूमिका साकारणाऱ्या सायंतानी घोष या अभिनेत्रीने ही भूमिका उत्कृष्टपणे साकारल्याबद्दल दिग्दर्शक महेश भट यांनी ‘ट्विटर’वरून तिचे आभारही मानले होते. मात्र तिच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या असंख्य चाहत्यांनी ‘ट्विटर’वर आपल्या प्रतिक्रिया नोंदवून या घटनेबद्दल आपली नापसंती आणि निराशा व्यक्त केली होती. त्यामुळे निर्माते असोत की चाहते, यापैकी कोणालाच नीलाच्या मृत्यूचा कथाभाग पसंत पडलेला नाही, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. ही अगदी अलीकडची घटना असतानाच आता या मालिकेची नायिका अवनी हिचाही आगामी भागांत मृत्यू ओढविणार असल्याच्या अफवा सुरू झाल्या आहेत.
हो, तुम्ही बरोबर वाचलेत. येत्या काही भागांत अवनीचाही करूण मृत्यू ओढविल्याचे दाखविण्यात येणार असून त्यामुळे नील आणि अवनी यांची प्रेमकथा कायमची अपुरी राहणार आहे. या मालिकेचे कथानक कोणत्या वळणाने पुढे सरकणार आहे, ते निर्मात्यांनी अद्याप स्पष्ट केले नसून अवनीचा मृत्यूही कशामुळे होणार आहे, ते उघड केलेले नाही. पण अवनीचा मृत्यू होणार आहे, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. “हो, या मालिकेत माझा मृत्यू ओढविणार असल्याचे प्रेक्षकांना दिसेल. ‘नामकरण’ मालिकेने एक अभिनेत्री म्हणून मला खूप काही दिलं आहे. त्यामुळे या मालिकेच्या हितासाठी मी काहीपण करायला तयार आहे,” असे अवनीची भूमिका रंगविणारी आदिती राठोड म्हणाली. नील आणि अवनी हे टीव्ही मालिकांतील सर्वांचे लाडके प्रेमीयुगुल मानले जाते. अशा स्थितीत अवनीचा मृत्यू दाखविल्यास प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी उमटेल, हे सांगणे अवघड आहे.
नामकरण ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेने आजवर अनेक वेळा लीप घेतलेला आहे.