'ससुराल सिमर का २' मालिकेच्या कलाकारांनी सीन उत्तमरित्या होण्यासाठी ३ तास स्विमिंग पूलमध्ये शूटिंग केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:10 IST2021-05-31T15:10:15+5:302021-05-31T15:10:30+5:30
स्विमिंग पूलमधील सीनसाठी अविनाश आणि राधिकाने उत्तमरित्या सीन होण्यासाठी जवळपास ३ तास स्विमिंग पूलमध्येच शूटिंग केले.

'ससुराल सिमर का २' मालिकेच्या कलाकारांनी सीन उत्तमरित्या होण्यासाठी ३ तास स्विमिंग पूलमध्ये शूटिंग केली
कलर्सवरील लोकप्रिय मालिका 'ससुराल सिमर का २'ने सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. मालिकेने मनोरंजन व ड्रामाचा दर्जा वाढवण्यासोबत सुरू असलेल्या रोमांचक एपिसोडसह प्रेक्षकवर्ग देखील वाढवला आहे. मालिकेमधील कलाकार देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत. स्विमिंग पूलमधील सीनसाठी अविनाश आणि राधिकाने उत्तमरित्या सीन होण्यासाठी जवळपास ३ तास स्विमिंग पूलमध्येच शूटिंग केले.
'ससुराल सिमर का २'च्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रोमांचक सीन पाहायला मिळणार आहे, जेथे ओस्वाल कुटुंब आरवच्या हळदी समारोहासाठी तयारी करण्यामध्ये व्यस्त आहे. समारोह सुरू असताना विवान मस्करी करत छोटी सिमर व आरवला स्विमिंग पूलमध्ये ढकलतो. रीमाला या घटनेबाबत काहीच माहित नाही आणि दोघांना एकत्र पूलमध्ये पाहिल्यानंतर तिला छोटी सिमरचा खूप राग येतो.
याबाबत सांगताना अविनाश मुखर्जी ऊर्फ आरव म्हणाला, ''निर्मात्यांनी मला या सीनबाबत सांगितले तेव्हा मी त्याबाबत खूपच उत्सुक झालो. मी माझ्या शालेय दिवसांपासूनच उत्तम स्विमर राहिलो आहे आणि मी पूर्णत: वॉटर बेबी आहे. पण यावेळी काहीसे वेगळे होते, कारण मी सिमरला वाचवतो आहे असे मला दाखवायचे होते. दिग्दर्शकांना हा सीन परफेक्ट असावा असे वाटत होते आणि तो उत्तमरित्या शूट होण्यासाठी जवळपास ३ तास लागले. पण उन्हाळा असल्यामुळे या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. माझी सह-कलाकार राधिका मुथुमकरने हा सीन शूट करताना उत्तमपणे साह्य केले. आम्ही शूटिंगदरम्यान सुरक्षिततेच्या खात्रीसाठी सर्व खबरदारी घेतल्या.''
याबाबत सांगताना राधिका ऊर्फ छोटी सिमर म्हणाली, ''स्विमिंग पूलमध्ये सीन शूट करण्याची माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती. सुरूवातीला मला भिती वाटली, पण माझा सह-कलाकार अविनाशने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि दिग्दर्शकांच्या साह्यासह मी सर्वोत्तमपणे सीन शूट करू शकले. आम्ही ३ तासांसाठी स्विमिंग पूलमध्येच होतो, पण ते निश्चितच माझ्यासाठी मजेशीर व नवीन होते.''