आठ हजार लोकांमधून अविनाश कुमारची झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 14:25 IST2017-05-03T08:55:15+5:302017-05-03T14:25:15+5:30

सेठजी ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेत बाजीरावची भूमिका साकारणाऱ्या अविनाश कुमारची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ...

Avinash Kumar's choice for eight thousand people | आठ हजार लोकांमधून अविनाश कुमारची झाली निवड

आठ हजार लोकांमधून अविनाश कुमारची झाली निवड

ठजी ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेत बाजीरावची भूमिका साकारणाऱ्या अविनाश कुमारची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या मालिकेतील अविनाशचे काम प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. अविनाश हा मुळचा रायपूरचा असून तो एखाद्या मालिकेत अथवा जाहिरातीत संधी मिळावी यासाठी कित्येक दिवसांपासून ऑडिशन्स देत होता. त्याने सेठजी या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि त्यातून त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले. 
ऑडिशनमधूनच बाजी या भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. खरे तर गेल्या वर्षीच या मालिकेसाठी त्याची निवड झाली होती आणि आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पहिल्याच मालिकेत प्रमुख भूमिका साकारायला मिळाली असल्याने सध्या अविनाश खूपच खूश आहे. या भूमिकेसाठी मालिकेच्या निर्मात्यांनी भारतातील विविध ठिकाणी जाऊन ऑडिशन घेतले होते. जवळजवळ आठ हजार लोकांच्या ऑडिशनमधून अविनाशची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. अविनाशचे ऑडिशन पाहून तोच या भूमिकेसाठी योग्य असल्याची या टीमला लगेचच खात्री पटली. याविषयी अविनाश सांगतो. मी या मालिकेत एक पेहलवानाची भूमिका साकारत आहे. मी गेल्या वर्षी जुलैमध्ये मुंबईत आलो आणि त्यानंतर मला या मालिकेच्या ऑडिशनबद्दल कळले. मी हे ऑडिशन दिले आणि काही राऊंडनंतर या भूमिकेसाठी माझी निवड झाली. या भूमिकेसाठी आठ हजार लोकांनी ऑडिशन दिल्याचे मला आधी माहीतच नव्हते. ते मला कोणी सांगितले असते तर मी ऑडिशनच्यावेळी नक्कीच नर्व्हस झालो असतो. मी रायपूरसारख्या छोट्याशा गावात राहात असल्याने माझ्यासमोर खूपच कमी संधी होत्या. पण मुंबईत आल्यावर माझे मालिकेत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. 

Web Title: Avinash Kumar's choice for eight thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.