अविकाने म्हटले, लोक म्हणायचे ‘१९ वर्षांनी मोठ्या असलेल्या या अभिनेत्यापासून मला दोन मुले आहेत’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 19:44 IST2017-11-03T14:12:35+5:302017-11-03T19:44:59+5:30

‘बालिका वधू’ आणि ‘ससुराल सिमर का’ यासारख्या मालिकांमध्ये काम करणारी अविका गौर हिने तिच्या आयुष्याशी निगडीत काही धक्कादायक खुलासे ...

Avikay said, people say, 'I have two children from this actor who is 19 years old'! | अविकाने म्हटले, लोक म्हणायचे ‘१९ वर्षांनी मोठ्या असलेल्या या अभिनेत्यापासून मला दोन मुले आहेत’!

अविकाने म्हटले, लोक म्हणायचे ‘१९ वर्षांनी मोठ्या असलेल्या या अभिनेत्यापासून मला दोन मुले आहेत’!

ालिका वधू’ आणि ‘ससुराल सिमर का’ यासारख्या मालिकांमध्ये काम करणारी अविका गौर हिने तिच्या आयुष्याशी निगडीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अविकाच्या मते, जेव्हा ती तेरा वर्षांची होती तेव्हा तिचे नाव माझ्यापेक्षा वयाने १९ वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेता मनीष रायसिंघानी याच्याशी जोडले जात होते. चौदाव्या वर्षी लोकांमध्ये अशी चर्चा रंगू लागली की मला, मनीषपासून दोन मुले आहेत. एका वेबसाइटशी बोलताना अविकाने हे खुलासे केले आहेत. 

पुढे बोलताना अविकाने म्हटले की, ‘मी आणि मनीष खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे लोक आमच्याबद्दल काय म्हणतात, याची आम्ही चिंता करीत नाही. मी वयाच्या तेराव्या वर्षी मनीषसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वय ३२ वर्षे होते. त्यावेळी माझे आणि मनीषच्या अफेअरची चर्चा माध्यमांमध्ये रंगू लागली. ऐवढेच काय तर आम्हाला दोन मुले आहेत, असा दावाही केला जाऊ लागला. तसेच असे म्हटले जात होते की, आम्ही आमची मुले लपवून ठेवली आहेत. अशाप्रकारच्या बातम्यांमुळे मी मानसिक आणि शारीरिीक स्वरूपात आजारी पडू लागली. 



सुरुवातीला मी अशाप्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष केले. अशा चर्चांमुळे आम्ही एकमेकांसोबत बोलणे बंद केले. तसेच एकमेकांना आम्ही टाळण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र लोकांनी आमच्या अशाप्रकारच्या अफवा पसरविणे बंद केले नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मैत्री करण्याचे ठरविले. मात्र आमच्यात कुठल्याही प्रकारचा रोमॅण्टिक इन्व्हॉलमेंट नव्हता, असे तिने सांगितले. यावेळी अविकाला विचारण्यात आले की, तू इतर कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस काय? तेव्हा तिने नाही असे उत्तर दिले. मी कधीच कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती. कारण माझे काम यासाठी मला परवानगी देत नाही. 

अविकाला विचारले की, मग मनीष इतर कोणाला डेट करीत आहे काय? याचेही उत्तर तिने नाही असे दिले. त्याच्याकडे इतर कोणाला डेट करण्यासाठी अजिबातच वेळ नाही. आम्ही दोघेही कामानंतर एवढे थकून जातो की, इतर कोणाला डेट करण्यास आम्हाला वेळच मिळत नाही. त्याचबरोबर अविकाला दोन वर्षांनंतर टीव्हीवर का परतलीस? असे विचारले असता तिने सांगितले की, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी ‘ससुराल सिमर का’ याकरिता सोडले होते की, मी माझ्या करिअरविषयी खूपच कन्फ्यूज होती. मला हे कळत नव्हते की, मी टीव्हीवर यापुढेही अभिनय करायला हवा. मला दिग्दर्शन करायचे होते. त्यामुळेच मी टीव्हीवरून ब्रेक घेतला. ब्रेक दरम्यान मी आणि मनीषने एक शॉट फिल्म बनविली. ही फिल्म विदेशात खूप पसंत केली. त्यानंतर जेव्हा चॅनेलने मला ‘लाडो-२’ आॅफर केले तेव्हा मी लगेचच त्यास होकार दिला, असेही तिने सांगितले. 

Web Title: Avikay said, people say, 'I have two children from this actor who is 19 years old'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.