'ती परत आलीये' मालिकेवर भडकले प्रेक्षक, होतोय मोठ्या प्रमाणात विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 05:49 PM2021-08-27T17:49:58+5:302021-08-27T17:50:42+5:30

देवमाणूस मालिकेच्या जागी आता नवीन मालिका ती परत आलीये भेटीला आली आहे.

Audiences are outraged over the series 'Ti Parat Aliye', there is a lot of opposition | 'ती परत आलीये' मालिकेवर भडकले प्रेक्षक, होतोय मोठ्या प्रमाणात विरोध

'ती परत आलीये' मालिकेवर भडकले प्रेक्षक, होतोय मोठ्या प्रमाणात विरोध

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील मालिका देवमाणूसच्या जागी आता नवीन मालिका ती परत आलीये भेटीला आली आहे. याचप्रमाणे इतर मालिका देखील बंद झाल्या आहेत. त्यांच्या जागी देखील आता दुसऱ्या मालिका सुरू होणार आहेत. काही दिवसांपूर्वी अग्गंबाई सूनबाई ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. त्या मालिकेच्या जागी दुसरी मालिका देखील सुरू होणार आहेत.

याआधी देखील किरण गायकवाड याने लागीर झालं जी या मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी किरण गायकवाड याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो लष्करी जवानाच्या गेटअपमध्ये दिसत आहे आणि डोंगराकडे तो उभा आहे. ही मालिका नेमकी कुठली आहे याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेत त्याच्या सोबत तेजश्री प्रधान देखील दिसणार असल्याचे सांगण्यात येते.


तर देव माणूस मालिका संपताना त्या जागी ती परत आलीये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. देव माणूस मालिका सुरू असतानाच ती परत आलीये या मालिकेचे प्रोमो सुरू होता, हा प्रोमो अतिशय भीतीदायक होते. त्यामुळे त्याला प्रेक्षकांनी विरोध केला होता. वाहिनीतर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रोमोत सर्वप्रथम दोन भयानक डोळे दाखविण्यात आले होते. त्यानंतर तिचे ओठ दाखवण्यात आले होते. मागे वाजणाऱ्या भीतीदायक पार्श्वसंगीतासोबत तिचा संपूर्ण चेहरा दाखवला होते. शेवटी ती एक बाहुली असल्याचे जाणवते. पण, ही बाहुलीदेखील पाहायला अत्यंत भयावह असल्यामुळे पाहणाऱ्याला तिच्यात जीव आहे असा भास होतो. तिचे मोठी बुबुळे असलेले डोळे पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवतात.

हा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी त्यांना भीतीचा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या प्रोमोमधील बाहुलीची तुलना 'एनाबेल' सोबत केली आहे.  आता मालिकेलादेखील प्रेक्षकांचा विरोध होत असल्याचे सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. 

Web Title: Audiences are outraged over the series 'Ti Parat Aliye', there is a lot of opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.