' का रे दुरावा' ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 21:40 IST2016-03-08T04:36:49+5:302016-03-07T21:40:05+5:30

झी मराठी वाहिनीने मालिका संपविण्याचा हट्टहास केला आहे वाटत. होणार सून मी ह्या घरची, दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेनंतर ...

The audience will take a series of 'Kai Re Drava' | ' का रे दुरावा' ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

' का रे दुरावा' ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मराठी वाहिनीने मालिका संपविण्याचा हट्टहास केला आहे वाटत. होणार सून मी ह्या घरची, दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेनंतर आता, 'का रे दुरावा' ही मालिकादेखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने जवळपास गेली सव्वा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. 'का रे दुरावा' या  मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले जय आणि आदिती यांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण ही प्रेमकहानी प्रेक्षकांना ज्ञात असली तरी, रील लाइफमध्ये ती त्यांच्या पूर्ण आॅफिसला कधी कळणार या प्रतिक्षेत प्रेक्षक होते? आता, ही प्रेमकहानी २६ मार्चला उघडकीस येणार आहे. या मालिकेत सुयश टिळक,सुरूची आडारकर प्रमुख भूमिकेत होते. तर सुबोध भावे, इला भाटे, अरूण नलावडे, नेहा जोशी आदि कलाकारांचा समावेश होता. चला, शेवटी 'का रे दुरावा' या मालिकेने घेतला तरी प्रेक्षकांचा दुरावा!

Web Title: The audience will take a series of 'Kai Re Drava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.