​त्रिदेविया ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 13:24 IST2017-08-07T07:54:52+5:302017-08-07T13:24:52+5:30

त्रिदेविया या मालिकेत ऐश्वर्या सखुजा प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याचसोबत रितुराज सिंग, अन्शुल त्रिवेदी, शालिनी सहुता, समायरा राव यांच्या ...

The audience will soon take a series of tragedy | ​त्रिदेविया ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

​त्रिदेविया ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

रिदेविया या मालिकेत ऐश्वर्या सखुजा प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याचसोबत रितुराज सिंग, अन्शुल त्रिवेदी, शालिनी सहुता, समायरा राव यांच्या या कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कार्यक्रमाची स्टारकास्ट तगडी असल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री होती. पण सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. गेल्या काही दिवसांपासून तर या कार्यक्रमाचा टीआरपी खूपच ढासळला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  
ऐश्वर्या सखुजाने सास बिना ससुराल या कार्यक्रमात साकारलेली टोस्टी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण त्रिदेविया या मालिकेत तिने साकारलेल्या धनश्री भूमिकेला प्रेक्षकांचे मन जिंकला जिंकता आले. या मालिकेविषयी ऐश्वर्या सांगते, त्रिदेविया या मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत काम करायला खूपच मजा आली. माझ्यासाठी हा खूपच चांगला अनुभव होता. मी सगळ्यांनाच खूप मिस करेन तर या मालिकेत मान्याची भूमिका साकारणारी शालिनी सहुता सांगते, माझ्या अभिनय कारकिर्दीत मला त्रिदेविया सारख्या मालिकेत काम करायला मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. मला एकाच मालिकेत विविध भूमिका साकारता आल्या. त्यामुळे मी मालिका माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार आहे. 
शंकर जय किशन ही मालिका त्रिदेविया या मालिकेची जागा घेणार आहे. मालिकेत मनू, शानू आणि तनू या तिघी सिक्रेट एजंट असल्याचे आपल्याला माहीतच आहे. मालिकेच्या शेवटच्या भागात मनू म्हणजेच शालिनी सहुता ही एजंट असल्याचे सगळ्यांना कळणार आहे. तर शानू आणि तनू सिक्रेट एजंट असल्याचे गुपित कायम राहाणार आहे.  

Also Read : शंकर जय किशनशंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग साकारणार तीन भूमिका

Web Title: The audience will soon take a series of tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.