आसिफ शेख उर्फ विभूतीने 'भाभीजी घरपर हैं'मध्ये साकारल्या २०० पेक्षा अधिक व्यक्तिरेखा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 06:30 AM2019-03-17T06:30:00+5:302019-03-17T11:34:18+5:30

टारझन, अंतराळवीर, शेतकरी आणि आपल्या प्रवासात गाढवासारखी एक वेगळी भूमिका अशा २०० पेक्षा अधिक अवतारांमध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने आपल्या व्यक्तिरेखांबाबत एक मोठा पल्ला पार केला आहे.

Asif Shaikh alias Vibhuti has more than 200 characters in 'Bhabhiji Gharir Hai'! | आसिफ शेख उर्फ विभूतीने 'भाभीजी घरपर हैं'मध्ये साकारल्या २०० पेक्षा अधिक व्यक्तिरेखा !

आसिफ शेख उर्फ विभूतीने 'भाभीजी घरपर हैं'मध्ये साकारल्या २०० पेक्षा अधिक व्यक्तिरेखा !

googlenewsNext

कोणत्याही भूमिकेला रसिकच हिट करतात किंवा फ्लॉप करतात. कलाकाराला स्वतःच त्याची क्षमता ओळखणं गरजेचं असतं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ''भाभीजी घरपर हैं''मधील विभूती नारायण मिश्रा हा शो सुरू झाल्यापासून सर्वाधिक लाडकी आणि विनोदी व्यक्तिरेखा ठरली आहे. टीव्ही आणि चित्रपट कलाकार असिफ शेख यांनी विभूतीसाठी प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. परंतु हा कलाकार अत्यंत वेगवेगळ्या रूपात आपल्या व्यक्तिरेखा समोर आणण्यासाठीही ओळखला जातो. सुपरहिरोच्या अत्यंत विचित्र रंगीबेरंगी अवतारात येण्यापासून ते विविध स्त्रीकेंद्री भूमिकांद्वारे आपल्यामधील स्त्रीत्वाचा प्रयोग करण्यापर्यंत असिफ शेख यांनी आपल्यामधील वैविध्यपूर्णता आणि अभिनयक्षमता दाखवली आहे. टारझन, अंतराळवीर, शेतकरी आणि आपल्या प्रवासात गाढवासारखी एक वेगळी भूमिका अशा २०० पेक्षा अधिक अवतारांमध्ये दिसलेल्या या अभिनेत्याने आपल्या व्यक्तिरेखांबाबत एक मोठा पल्ला पार केला आहे.

आपल्या अविस्मरणीय प्रवासाकडे अभिमानाने वळून पाहताना आसिफ म्हणाला की, ''२०१४मध्ये पहिला एपिसोड सादर झाल्यापासून आतापर्यंत १००० पेक्षा अधिक एपिसोड्स पूर्ण झाले आहेत आणि माझ्या भाभीजी घरपर हैंमधील विभूती या व्यक्तिरेखेने आतापर्यंत २०० पेक्षा अधिक अवतार धारण केले आहेत. मी या शोमध्ये इतरही अनेक विशेष भूमिका करण्याचे ठरवले असले तरी मला स्त्रीच्या भूमिकेत काम करताना सर्वाधिक आनंद झाला.''

''मी स्त्रीच्या १५ पेक्षा अधिक भूमिका पार पाडल्या आहेत. इतक्या की, या अभिनयासाठी आवश्यक असलेले सर्व कपडे आणि साहित्य माझ्यासाठी कायमस्वरूपी खरेदी करून माझ्या कपाटात ठेवण्यात आले आहे. मी जेव्हा-जेव्हा बाईचा वेश परिधान करतो तेव्हा-तेव्हा इतर कलाकार मला चिडवतात आणि माझ्यासोबत फ्लर्टिंग करण्याचा प्रयत्न करतात,'' असे असिफ गंमती गंमतीत सांगतो. आपल्या या वेडाबाबत मित्राची प्रतिक्रिया सांगताना हा अभिनेता हसत हसत म्हणाला की, “माझा एक मित्र मला सेटवर भेटायला आला आणि माझ्या व्यक्तिरेखेचे कपडे बघून चक्रावला. त्याने मला त्या अवतारात पाहिलं आणि तो भांबावून गेला.”

आपल्याला सर्वाधिक आवडणाऱ्या व्यक्तिरेखांबाबत बोलताना आसिफ म्हणाला की, ''ही यादी खूप मोठी आहे, पण मला काही व्यक्तिरेखांनी अविस्मरणीय आठवणी दिल्या. त्यातली एक म्हणजे कबाडीवाला ज्याचं नाव डार्लिंग होतं, एक अत्यंत देखणा असलेला इलेक्ट्रिशियन राजाराम होता आणि मी तिवारीच्या आजीच्या रूपात केस पांढरे केले ती एक आठवण. मला आठवतंय की, मी आणि रोहिताश्व अगदी पोट धरून हसत होतो. आजीचे आपल्या मुलाबाबत असलेले फ्रस्ट्रेशन दाखवण्यासाठी आणि त्या व्यक्तिरेखेला खुलवण्यासाठी मला रोहिताश्वला खरोखर मारावे आणि लाथाडावे लागले होते. सुदैवाने तो इतका चांगला माणूस आहे की, रोहिताश्वने कधीही तक्रार केली नाही आणि त्याने खरंतर त्या सीन्सच्या वेळी खूपच सहकार्य केले.''

आपल्या पुरूष सह-कलाकारांबाबत प्रेम व्यक्त करताना आसिफ म्हणाला की, ''मी आणि रोहिताश्व आमच्या दोघांचे खूप चांगले जमते आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा येऊ शकत नाही. आम्ही कायमच एकमेकांची कला जपून काम केले आहे आणि त्याचमुळे आम्ही एकमेकांचे विनोदी टायमिंगही आनंदाने जपू शकतो.''

संपूर्ण टीमसोबत काम करताना आणि त्याला या प्रवासात आलेल्या आव्हानांबाबत बोलताना आसिफ म्हणाला की, ''आधी एक कलाकार म्हणून माझ्यासाठी व्यक्तिरेखेत शिरणे कठीण होते. परंतु शशांक आणि मनोज यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्या भूमिका साकारणे खूप सोपे केले. मी विभीषणची भूमिका अचूकपणे न केल्याबद्दल अलीकडेच मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आणि धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप माझ्यावर झाला. एका कॉमेडी शोचा भाग म्हणून आम्ही ते खेळीमेळीने घ्यायचे ठरवले आणि आमच्या प्रेक्षकांना आनंदी ठेवण्यावर भर दिला.

आजपर्यंत मला विविध व्यक्तिरेखा साकारताना खूप आनंद मिळाला आणि प्रेक्षकांचे या व्यक्तिरेखांवरील प्रेम मला पुढे नेत राहते. मला लोकांना आनंदी ठेवायला आवडते आणि मी शक्य तेव्हा तसा प्रयत्न करतच राहीन.'' सध्या प्राप्त केलेल्या यशापेक्षा आणखी यश मिळवण्याच्या हेतूने आसिफ शेख या शोमध्ये आणखी नवीन व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सज्ज आहे. ते प्रेक्षकांना हसवत राहतील आणि त्यांचे मनोरंजन करतील.

Web Title: Asif Shaikh alias Vibhuti has more than 200 characters in 'Bhabhiji Gharir Hai'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.