अश्विनी मुकादम झळकणार गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 17:36 IST2017-07-08T12:06:30+5:302017-07-08T17:36:30+5:30
अश्विनी मुकादमने रात्रीस खेळ चाले या मालिकेत सरिता ही भूमिका साकारली होती. तिच्या या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती ...

अश्विनी मुकादम झळकणार गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत
अ ्विनी मुकादमने रात्रीस खेळ चाले या मालिकेत सरिता ही भूमिका साकारली होती. तिच्या या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या मालिकेनंतर ती काही दिवसांपूर्वी 100 डेज या मालिकेत झळकली होती. या मालिकेतील तिची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली होती. आता पुन्हा एकदा अश्विनी छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
अश्विनीने गेल्या काही काळात खूपच वेगळ्या आणि चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आणि आता गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत ती दिसणार आहे. या मालिकेत ती हॉस्टेलमधील वॉर्डनची भूमिका साकारणार आहे. रात्रीस खेळ चाले आणि 100 डेज या मालिकेतील तिच्या भूमिकांपेक्षा तिची या मालिकेतील भूमिका ही वेगळी असणार आहे.
“गर्ल्स हॉस्टेल” कोणीतरी आहे तिथे ... या मालिकेत एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी सारा, प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, नेहा आणि वनिता या पुणे, नाशिक, पंढरपूर, मराठवाडा अशा आणि इतर वेगवेगळ्या शहरांतून मुंबईत आल्या आहेत. या मुली सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये एकमेकींच्या रूममेट्स असून धमाल मस्ती करत आपले जीवन जगत आहेत. रोजच्या आयुष्यातील संघर्ष करत असताना त्यांना हॉस्टेलच्या भिंतीच्या आत नेहमीच प्रचंड सुरक्षित वाटते. सावित्री गर्ल्स हॉस्टेलमधील या मुलींना सगळ्यात मोठा आधार हा एकमेकींचा आहे. याच त्यांच्या सावित्री गर्ल्स हॉस्टेलच्या सुरक्षित जगात अतिशय भयानक घटना घडते. या घटनेमुळे या मुलींच्या आयुष्यातील धमाल मस्ती संपून त्याची जागा थरकाप उडवणारे भय घेते. गूढ घटनांची साखळी वाढू लागते आणि त्यानंतर सुरू होते एक अनाकलनीय प्रसंगांचे भयंकर चक्र! या सर्व मुली एक एक करून या चक्रात गुरफूटल्या जातात. हॉस्टेलमध्ये कोणीतरी आहे ही भावना बळावू लागून एक भीतीचे सावट पसरू लागते. याच सावित्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये अश्विनी मुकादम काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Also Read : “गर्ल्स हॉस्टेल”... लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस