​आशुतोष कुलकर्णी झळकणार लेक माझी लाडकी या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 13:08 IST2017-06-06T07:38:40+5:302017-06-06T13:08:40+5:30

मिस मॅच, कुणी मुलगी देता का मुलगी या चित्रपटांमध्ये अभिनेता आशुतोष कुलकर्णी याने काम केले आहे. गंध फुलांचा गेला ...

Ashutosh Kulkarni will be seen in this series | ​आशुतोष कुलकर्णी झळकणार लेक माझी लाडकी या मालिकेत

​आशुतोष कुलकर्णी झळकणार लेक माझी लाडकी या मालिकेत

स मॅच, कुणी मुलगी देता का मुलगी या चित्रपटांमध्ये अभिनेता आशुतोष कुलकर्णी याने काम केले आहे. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत देखील तो झळकला होता. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. लेक माझी लाडकी या मालिकेत लवकरच त्याची एंट्री होणार आहे. 
लेक माझी लाडकी मालिका सुरू होऊन वर्ष झाले आहे. गेल्या वर्षभरात या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. आता या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. आशुतोषची या मालिकेत एंट्री होणार असून या मालिकेत तो डॉ. ऋषिकेश अग्निहोत्री ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेमुळे कथानकाला नवी कलाटणी मिळणार आहे. त्याच्या एंट्रीनंतर कथानकातील गुंता अधिक निर्माण होणार आहे की नात्यांबाबत उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल होणार आहे हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
'लेक माझी लाडकी' या मालिकेत एकीकडे मीरासाठी स्थळं पाहिली जात आहेत तर दुसरीकडे सानिका आणि मीरा यांच्यात साकेत  अडकला आहे. तसेच इरावती, आदित्य आणि जयदेव यांच्यातही वेगळा संघर्ष सुरू आहे. या परिस्थितीत फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉ. ऋषिकेश अग्निहोत्रीचा त्यांच्या कुटुंबात प्रवेश होणार आहे. अपघातात पाय दुखावलेल्या जयदेववर तो उपचार करणार आहे. मात्र त्याच्या येण्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. मात्र जयदेवच्या घरात येण्यामागे डॉ. ऋषिकेशचा काही हेतू आहे का, हे पहाणे रंजक ठरणार आहे. 
डॉ. ऋषिकेशच्या येण्याने मीरा, साकेत, सानिका, इरावती, जयदेव, आदित्य यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. 

Web Title: Ashutosh Kulkarni will be seen in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.