मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता जोशी. या दोघांनीही एस से ...
अशोक सराफ- निवेदिता क्युटेस्ट कपल
/> मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता जोशी. या दोघांनीही एस से बढकर एक असे अनेक चित्रपट देऊन त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ पाडली यात शंका नाही. या जोडीचे अनेक चाहते आहेतच परंतू यामध्ये कलाकारांचा देखील समावेश आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी या जोडीचे फॅन आहेत. मग अशातच सगळ््यांची लाडकी अभिनेत्री पुजा सावंत कशी मागे राहणार. पुजाला यांची जोडी फार आवडते असे आम्ही नाही तर तीच सांगतिये. एवढेच नाही तर या सदाबहार जोडीला ती क्युटेस्ट कपल इन धिस वर्ल्ड असे म्हणतीये. आपल्या या फेव्हरेट जोडीसोबत एक फोटो क्लिक करण्याचा मोह पुजाला आवरता आला नाही. तिने या कपल सोबत मस्त फोटो काढुन तो सोशल साईटवर अपलोड केला आहे.