'अशोक मा.मा.' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, घर सोडून गेलेला ईशानची कशी काढणार समजूत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:44 IST2025-06-27T18:43:43+5:302025-06-27T18:44:19+5:30

Ashok Ma.Ma. series : 'अशोक मा.मा.' ही मालिका नात्यांतील गुंतागुंतीच्या धाग्यांवर नेमकं भाष्य करत असल्याने प्रेक्षकांच्या मनाला भावते आहे.

'Ashok Ma.Ma.' series takes a thrilling turn, how will they reconcile with Ishaan, who left home? | 'अशोक मा.मा.' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, घर सोडून गेलेला ईशानची कशी काढणार समजूत?

'अशोक मा.मा.' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, घर सोडून गेलेला ईशानची कशी काढणार समजूत?

कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' (Ashok Ma.Ma. series) ही मालिका नात्यांतील गुंतागुंतीच्या धाग्यांवर नेमकं भाष्य करत असल्याने प्रेक्षकांच्या मनाला भावते आहे. सुरुवातीपासून या मालिकेने रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच या  मालिकेने नुकताच २०० भागाचा पल्ला गाठला आहे. आगामी भागात कुटुंबात एक तणावपूर्ण प्रसंग उभा राहणार आहे, जेव्हा छोटा ईशान अचानक घरातून निघून जातो. त्याचा शोध कसा घेणार आणि त्याची अशोक मामा कशी समजूत काढणार, हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

शाळेत त्याला अनाथ असल्याचं म्हणत चिडवलं जात असल्याने त्याच्या मनात खोलवर त्या गोष्टीचा परिणाम झाला आहे आणि त्यात तो एकट्याच बाहेर पडतो. कुटुंबात एकीकडे नोकरी, जबाबदाऱ्या, पालकत्व आणि नातेसंबंध यांची घडी बसवण्याचे प्रयत्न सुरू असताना, ईशान एका क्षणी एकटाच घराबाहेर निघून जातो. घरच्यांना जेव्हा त्याच्या अनुपस्थितीची जाणीव होते, तेव्हा घरात अस्वस्थता आणि घबराट पसरते. भैरवी, अनिश आणि मामा ईशानच्या शोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मामा संयमाने शोधाची सूत्रं हातात घेतात.


अशोक मा.मा. पुन्हा एकदा घरचा आधार बनतात. सर्वत्र शोधाशोध आणि चिंता वाढलेली असताना, अशोक मामा एक सशक्त स्तंभ ठरतात. अनेक शक्यतांचा विचार करत, ते ईशानपर्यंत कसे पोहचणार? आणि त्याला सुरक्षित घरी कसे घेणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ईशानच्या मनात काही ना काही सल आहे ते नक्की काय आहे हे मामांना कळेल? त्यामुळे आगामी भाग पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: 'Ashok Ma.Ma.' series takes a thrilling turn, how will they reconcile with Ishaan, who left home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.