आशीष कौलची होणार या मालिकेत प्रवेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 06:30 IST2018-08-10T14:46:29+5:302018-08-11T06:30:00+5:30
आता लवकरच ही मालिका तब्बल सात वर्षांनी पुढे जाणार आहे.त्यामुळे सात वर्षांच्या मुस्कानची व्यक्तिरेखा आता भविष्यात 18 वर्षांची अभिनेत्री साकारणार असून त्याचे मूळ आशीषच्या व्यक्तिरेखेशी निगडित असणार आहे.

आशीष कौलची होणार या मालिकेत प्रवेश!
कथानकानुसार मालिकांमध्ये किंवा कॅरेक्टरमध्ये बदल हे होतच असतात. रसिकांना सतत काही तरी नाविन्य देण्याची डेलिसोपची धडपड असते. मालिकांमध्ये नविन कलाकारांची एंट्री तर काहींची एक्झिट होणे या गोष्टी काही नवीन नाही. टीव्ही मालिकांमध्ये काही निवडक अभिनेत्यांचे वर्चस्व असले, तरी अद्याप अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अशाच महत्त्वाच्या अभिनेत्यांमध्ये आशीष कौलचा समावेश होणार आहे. आशीषने आजवर अनेक नकारात्मक भूमिका रंगविल्या असून आता तो छोट्या पडद्यावरी ‘मुस्कान’ या मालिकेत लवकरच प्रवेश करणार आहे. या मालिकेतही तो एका खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.
या मालिकेत आशीषच्या व्यक्तिरेखेला ‘व्हीआयपी’ नावाची भूमिकेत दिसेल. त्यामुळे आता मुस्कानचे भवितव्य या व्हीआयपीच्या निर्णयावरच अवलंबून असेल. तसेच आता लवकरच ही मालिका तब्बल सात वर्षांनी पुढे जाणार आहे.त्यामुळे सात वर्षांच्या मुस्कानची व्यक्तिरेखा आता भविष्यात 18 वर्षांची अभिनेत्री साकारणार असून त्याचे मूळ आशीषच्या व्यक्तिरेखेशी निगडित असणार आहे. मालिकेत कथानकाला नवी कलाटणी देण्यासाठी आशीषच्या व्हीआयपी व्यक्तिरेखेची आखणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात आशीष कौल म्हणाला, “रश्मी शर्मा टेलिफिल्म्सशी माझे गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. अनेक मालिकां रंजक वळणांमुळे यशस्वी ठरल्या आहेत. अशाच चांगले कथानक असणा-या मालिकांची त्यांनी निर्मिती केली आहे.त्यांच्या मालिकेत मलाही काम करण्याची संधी त्यांनी दिली होती. आता पुन्हा अनेक वर्षानंतर मला या प्रोडक्शनबरोबर काम करण्याची संधी मिळते आहे.त्यामुळे त्यांना नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.आजही रसिक मला आर्यमन म्हणूनच ओळखतात. ‘कुसुम’ मालिकेत मी आर्यमानची भूमिका रंगविली जी नंतर खूपच लोकप्रिय झाली. ‘कहानी घर घर की’मधील माझ्या व्यक्तिरेखेचीही भरपूर प्रशंसा करण्यात आली होती. आता ‘मुस्कान’मधील माझ्या भूमिकेबद्दल मी उत्सुक असून प्रेक्षकांना ती भूमिका नक्कीच पसंत पडेल.”असा विश्वास आशिष कौशलने व्यक्त केले आहे.
‘मुस्कान’ ही मालिका आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित आहे. या मालिकेचा कथाभाग टीव्हीवरील नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळा आहे.या मालिकेतील मुस्कानच्या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती.परंतु त्यामुळे हर्षालीला चित्रपटांतील भूमिका गमवाव्या लागल्या असत्या आणि हर्षालीला चित्रपटातील भूमिकांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने तिने या मालिकेत भूमिका रंगविण्यास नकार दिला असे बोलले जाते. त्यामुळे सोनाक्षी सावे या मुलीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.आता मोठ्या मुस्कानच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार हे पाहाणे रंजक ठरणार आहे.