आशा भोसले यांनी केली सारेगमपा लिटल चॅम्प्सच्या स्पर्धकाला मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 12:12 IST2017-03-30T06:42:15+5:302017-03-30T12:12:15+5:30

सारेगमपा लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात आता कोण स्पर्धक बाजी मारेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला ...

Asha Bhosale has assisted the participants of Shergut's Little Champs | आशा भोसले यांनी केली सारेगमपा लिटल चॅम्प्सच्या स्पर्धकाला मदत

आशा भोसले यांनी केली सारेगमपा लिटल चॅम्प्सच्या स्पर्धकाला मदत

रेगमपा लिटल चॅम्प्स या कार्यक्रमात आता कोण स्पर्धक बाजी मारेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला एक ना एक तरी सेलिब्रेटी परीक्षक हजेरी लावत असतो. आता या कार्यक्रमात प्रेक्षकांना आशा भोसले यांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील गौरवशाली 75 वर्षं साजरी केली जाणार आहेत. या सेटवर येऊन आशा भोसले यांनी सगळ्या स्पर्धकांसोबत गप्पा तर मारल्या. पण त्याचसोबत त्यांच्या आवाजाचे कौतुकदेखील केले. 
आशा भोसले यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे झेलली असली तरी त्या नेहमी सकारात्मक राहिल्या. संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवतात असे त्यांचे म्हणणे आहे. संकटांमुळे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजून मेहनत घेण्यास आपण प्रवृत्त होतो असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात जसू खान आणि अदनान हुसेन हे दोन स्पर्धक आहेत. या दोघांची हृदयद्रावक कथा ऐकून आशा भोसले यांचे मन भरून आले. 
जसू खानला केवळ 13व्या वर्षी त्याच्या घरची जबाबदारी सांभाळावी लागली. वडील दारुडे असल्याने त्याला लहानपण विसरून घर चालवावे लागले. पैसे मिळवण्यासाठी तो लग्न समारंभ आणि पार्टी यांमध्ये जाऊन गाऊ लागला हे सगळे ऐकून आशा भोसले यांना खूपच वाईट वाटले. त्याचसोबत हुसेन याचेही आयुष्य काही सोपे नव्हते. अतिशय काबाडकष्ट करून त्याच्या कुटुंबाचे कसेबसे भागत होते. पण त्या परिस्थितीतही त्यांनी त्याला गायनाचे धडे दिले. त्याला या मंचावर येण्यासाठी अनेक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. लहानपण हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे आणि पुढील आयुष्याचाही पाया आहे. बालपण परत कधी मिळत नाही. त्यामुळे सर्वांनाच अतिशय आनंदी बालपण मिळायला हवे असे आशा भोसले यांचे म्हणणे होते. त्यामुळे या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या यापुढील प्रवासात मदत म्हणून आशाताईंनी जसू आणि अदनानच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपयांची मदत केली. 
आशा भोसलेंच्या या खास भागात सगळे स्पर्धक आशा भोसले यांची हिट गाणी गाणार आहेत. 

Web Title: Asha Bhosale has assisted the participants of Shergut's Little Champs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.