'आई कुठे काय करते'मधील अरूंधतीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 13:56 IST2022-01-21T13:55:04+5:302022-01-21T13:56:03+5:30
Aai Kuthe Kay Karte : गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अरूंधती पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना अरुंधती कुठे गेली, असा प्रश्न पडला आहे.

'आई कुठे काय करते'मधील अरूंधतीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. या मालिकेबद्दल आणि मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अरूंधती पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना अरुंधती कुठे गेली, असा प्रश्न पडला आहे. अरूंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने मालिकेतून ब्रेक घेतल्याचे समोर आले आहे. यामागचे कारणदेखील समोर आले आहे.
मराठी सिरियलच्या रिपोर्टनुसार, आई कुठे काय करते मालिकेच्या गेल्या तीन भागांपासून अरूंधती पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती कुठे गेली, असा प्रश्न पडला होता. याचे कारण समोर आले आहे. अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारते आहे. तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिने मालिकेतून काही ब्रेक घेतला असल्याचे समजते आहे. तिचे चाहते तिला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत.
अनघाने घरात घेतली अरुंधतीची जागा
आई कुठे काय करते मालिकेत नुकतेच अभिषेक आणि अनघाचे लग्न झाले आणि देशमुखांच्या घरात अनघाने अरुंधतीची जागा घेतली आहे. ती अरूंधती प्रमाणेच सर्वांच्या आवडीनिवडीनुसार जेवण बनवते आहे. सर्वांची काळजी घेताना दिसत आहे. इतकेच नाही तर ईशासोबत ती मैत्री करते. त्यामुळे घरात छान वातावरण पाहायला मिळत आहे. फक्त अनिरूद्धला आशुतोषसोबत अरुंधती आणि यशची वाढलेली जवळीक आवडलेली नाही. त्यामुळे सतत तो वाद घालताना दिसत आहे.