'आई कुठे काय करते'चं कथानक उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधती देणार अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 03:42 PM2021-01-12T15:42:04+5:302021-01-12T15:42:37+5:30

‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस देणार आहे.

Arundhati to issue divorce notice to Aniruddha in Aai Kuthe Kay Karte serial | 'आई कुठे काय करते'चं कथानक उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधती देणार अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस

'आई कुठे काय करते'चं कथानक उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधती देणार अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस देणार आहे. अरुंधतीच्या या निर्णयामुळे अनिरुद्धच्या अहंकाराला धक्का बसणार हे नक्की.

खरेतर अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वावलंबी झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरले आहे. आता मात्र नको असलेल्या बंधनातून मुक्त व्हायचे अरुंधतीने ठरवले आहे. त्यामुळेच अनिरुद्धला घटस्फोट देण्याचा मोठा निर्णय तिने घेतला आहे.

मालिकेतल्या या निर्णायक वळणाबद्दल सांगताना अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाल्या, ‘एकेकाळी अनिरुद्धवर मनापासून प्रेम केल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेणे अरुंधतीसाठी सोपी गोष्ट नाही. या परिस्थितीचा सामना खूप धाडसाने आणि धैर्याने करायचे तिने ठरवले आहे. आई कुठे काय करते मालिकेतून स्थिर असा स्त्रीवाद दाखवण्यात येत आहे. कुठेही आरडाओरडा नाही, स्त्रीमुक्ती चळवळीच्या घोषणा नाहीत, आक्रस्ताळेपणा नाही. अरुंधती अत्यंत ठामपणे आणि सत्सकविवेकबुद्धीला स्मरुन शांतपणे निर्णय घेते हे तिच्या व्यक्तिरेखेचे वेगळेपण आहे. या सगळ्यात घरातल्या जबाबदाऱ्या न नाकारता इतर कोणतीही नाती न विस्कटू देता ती तिच्या न्यायासाठी लढते आहे.’ 


अरुंधतीच्या या निर्णयावर अनिरुद्ध काय करणार आणि अरुंधतीचा पुढचा प्रवास कसा असणार हे पहाणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Arundhati to issue divorce notice to Aniruddha in Aai Kuthe Kay Karte serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.